Chhaava Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा'नं मोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड, जगभरात किती कोटींची कमाई?

Chhaava Box Office Collection Day 12: विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये तुफान वाढ होताना पाहायला मिळत आहे. १२ दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

विकी कौशलचा (vicky kaushal) 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे विकीच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.

'छावा'' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 17 कोटी रुपये

  • एकूण कमाई - 365.25 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'छावा' चित्रपटाने कमाईमध्ये 'बाहुबली 2', 'पुष्पा 2' या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात 'छावा' चित्रपटाने 444.5 कोटी रुपये कमावले आहेत. 'छावा' ने दुसऱ्या मंगळवारच्या कमाईत 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला आहे. आता पहिल्या नंबरवर 'पुष्पा 2'तर दुसऱ्या नंबरवर 'छावा' आहे. आता लवकरच 'छावा' 'पुष्पा 2' रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.

'छावा' स्टारकास्ट

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे. तर महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील पाहायला मिळत आहे. 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांना मारण्यासाठी 'ही' अगरबत्ती घेताय? त्याआधी ही माहिती वाचाच

ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

SCROLL FOR NEXT