Chandravilas Marathi Tv Serial Saamtv
मनोरंजन बातम्या

TV Serial: गुढ अंधारमय जगाची उलटी वाट, थरकाप उडवणार भितीची लाट! नवी रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला..

'चंद्रविलास' ही रहस्यमय कथा असलेली मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gangappa Pujari

New TV Serial On Zee Marathi: टेलिव्हिजन वाहिन्यांवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांसाठी 'चंद्रविलास' ही रहस्यमय कथा असलेली मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ मार्चपासून रात्री ११ वाजता या मालिकेच्या प्रक्षेपणाला सुरूवात होणार आहे. (Marathi TV Serial)

अशी आहे मालिकेची कथा...

या नव्या कोरी मालिकेत दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची कथा रंगवली आहे. अनंत महाजन आणि त्यांची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय.

त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. चंद्रविलासमधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे.

वैभव मांगले साकारणार प्रमूख भूमिका...

दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का, हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल. या मालिकेचे लेखन समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी केले आहे. तर वैभव मांगले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT