Sagar Karande : 'चला हवा येऊ द्या'नंतर सागर कारंडेची लागली लॉट्री, लवकरच दिसणार 'या' हिंदी कार्यक्रमांत
Sagar Karande In Madness Machayenge Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sagar Karande : 'चला हवा येऊ द्या'नंतर सागर कारंडेची लागली लॉट्री, लवकरच दिसणार 'या' हिंदी कार्यक्रमांत

Chetan Bodke

सोनी टेलिव्हिजनवरील 'मॅडनेस मचायेंगे' या शोची प्रेक्षकांमध्ये कमालीची चर्चा सुरू आहे. या शोमध्ये अनेक मराठीसह हिंदी टेलिव्हिजन कलाकारांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका नव्या मराठमोळ्या कलाकाराचा या शोमध्ये समावेश झाला आहे. हा दुसरा तिसरा कोणीही नसून 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे आहे. सध्या सोशल मीडियावर सागर कारंडेच्या स्किटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या शोमध्ये गौरव मोरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, हेमांगी कवी, अतिशा नाईक हे मराठमोळे सेलिब्रिटी आहेत. आता यांच्यासोबत मराठमोळा अभिनेता सागर कारंडे ही स्क्रिन शेअर करणार आहे. हा देखील आता प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे. आपल्या कॉमेडीच्या जोरावर सागर कारंडेने मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तसाच तो आता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सोनी टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सागर कारंडेच्या स्किट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये सागर आपल्या खास मनोरंजनाच्या स्टाईलमध्ये तो मनोरंजन करताना दिसत आहे. सागर कारंडे, गौरव दुबे आणि स्नेहिल मेहरा हे तिघेही एकत्र स्किट सादर करणार आहे. अभिनेत्याचा हा हिंदी टिव्हीवरील पहिलाच प्रोग्राम आहे. सध्या सागरचे चाहते कौतुक करीत आहेत. कधी स्वारगेट बाई तर कधी पोस्टमनच्या भूमिकेतून सागर कारंडेने मराठमोळ्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. सागरने त्याच्या आजारपणामुळे 'चला हवा येऊ द्या' ला निरोप दिला होता.

अपुरी झोप आणि वेळेवर जेवण नसल्यामुळे सागर आजारी पडला होता. यामुळे सागर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्यानंतर तो बरेच दिवस मराठी नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आता त्यानंतर थेट सागर हिंदी कार्यक्रमात दिसणार असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Remove Odour From Shoes : पावसाळ्यात तुमच्याही शूजमधून कुबट वास येतोय? तर 'हे' उपाय करा...

Jitendra Awhad News: नागालँड केस संदर्भात आव्हाडांची प्रतिक्रिया!

Marathi Live News Updates: रायगडमध्ये धो-धो बरसला; सरासरी 56.61 मिमी पावसाची नोंद

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

Health Benefits : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

SCROLL FOR NEXT