Vivek Agnihotri Censor Board Made 9 Changes In The Vaccine War Twitter/ @vivekagnihotri
मनोरंजन बातम्या

The Vaccine War: 'द व्हॅक्सिन वॉर'च्या संवादावर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप, निर्मात्यांना 'हे' बदल करण्याचे दिल्या सुचना

Vivek Agnihotri Film The Vaccine War: सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटामध्ये काही बदल करण्याच्या सुचना दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vivek Agnihotri Censor Board Made 9 Changes In The Vaccine War

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. 'द व्हॅक्सिन वॉर' चा गेल्या काही दिवसांपूर्वी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपट येत्या २८ सप्टेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटामध्ये काही बदल करण्याच्या सुचना दिली आहे.

'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये पंतप्रधानांसंदर्भात बोलण्यात आलेले काही संवाद सेन्सॉर बोर्डाने बदलले आहेत. सोबतच चित्रपटाच्या संवादामध्ये काही ठिकाणी विश्वगुरू या शब्दाचा वापर करण्यात आला होता, या शब्दाला देखील बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. यासोबतच बोर्डाने निर्मात्यांना आक्षेपार्ह्य शब्द सुद्धा बदलण्यासाठी सांगितले आहे.

Vivek Agnihotri Censor Board Made 9 Changes In The Vaccine War

चित्रपटाचं टायटल इंग्रजी नाही तर, हिंदी असावं. सोबतच, डिस्क्लेमर प्रेक्षकांना वाचता येईल, असे असायला हवे. काही वादग्रस्त संवाद देखील काढून टाकण्यात आले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचा संदर्भ असलेला संवादही काढून टाकण्यात आला आहे. सोबतच 'और बनाओ मंदिर' या संवादा ऐवजी बोर्डाने 'ऐसे बनेंगे हम विश्वगुरु' असा संवाद घेण्यात आला आहे. सोबतच एका संवादातून विश्वगुरू हा शब्द देखील काढून टाकण्यात आला आहे. सोबतच पंतप्रधानांच्या संवादातही बदल सुचवला आहे. बोर्डाने व्हॅक्सिनच्या संवादात सुद्धा काही बदल सांगितला. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटामध्ये इतके बदल केले आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर 'द व्हॅक्सिन वॉर'चा टीझर प्रदर्शित झाला होता. सोबतच टीझर प्रदर्शित करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. द काश्मीर फाइल्सच्या यशानंतर , दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याच्या पुढील चित्रपट, द व्हॅक्सिन वॉरची घोषणा केली होती. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शकांनी जास्त काही माहिती दिली नाही. कोविड-१९च्या काळात वैद्यकीय बंधुत्व आणि शास्त्रज्ञांच्या समर्पणाला या चित्रपटातून मानवंदना अर्पण केली आहे.

चित्रपटाचा कालावधी २ तास ४० मिनिटांचा असून टीझर प्रदर्शित झाला तेव्हा, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. चित्रपटाची कथा कोरोना काळात तयार करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी लसीच्या निर्मितीसंदर्भात आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, रायमा सेन यांच्यासोबत अनेक कलाकार झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

SCROLL FOR NEXT