Aaliyah-Shane Engagement Celebration  Saam TV
मनोरंजन बातम्या

Anurag Kashyap's Daughter Engagement: अनुराग कश्यपने केले मुलगीच्या साखरपुड्याचे ग्रँड सेलिब्रेशन; आलिया-शेनचे रोमँटिक फोटो व्हायरल

Aaliyah Kashyap Share Photo : आलियाने तिच्या साखरपुडा समारंभातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Dange

Anurag Kashyap's Daughter Aaliyah-Share Engagement Photo:

बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलिया तिच्या लॉंग टाईम बॉयफ्रेंड शेन ग्रेगोईरेशी मे २०२३मध्ये एंगेजमेंट केली होती.

गुरुवारी रात्री अनुराग कश्पय यांनी मुलीच्या साखरपुड्याची मुंबईत ग्रँड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील ब-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सुहाना खान, अगस्त नंदा, खुशी कपूर, पलक तिवारी, इब्राहम अली खान, कलकी कोचिनसह अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

शुक्रवारी आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. आलियाने तिच्या साखरपुडा समारंभातील काही फोटो पोस्ट केले आहेत. तर या फोटोंना कॅप्शन देत लिहिले आहे, 'अबाउट लास्ट नाईट'

आलिया आणि शेनने व्हाईट कलरचे आणि सिल्व्हर कलरचे कॉम्बिनेशन केले होते. आलियाने वर्क असलेले लेहेंगा घातला होता. त्यावर डायमंड आणि पर्लचे कॉम्बिनेशन असलेली ज्वेलरी घातली होती. तर शेन ग्रेगोईर लाँग कोट आणि सदरा -पायजमा घातला आहे.

आलिया कश्यपने मी महिन्यात शेन ग्रेगोईरशी एंगेजमेंट केली होती. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने चाहत्यांना ही माहिती दिली होती. 'माझा बेस्ट, पार्टनर, आता माझ्या होणार जोडीदार! तू माझे प्रेम आहेस. खरे आणि बिनशर्त प्रेम केल्यावरबद्दल धन्यवाद.

तुला हो म्हणहे हि माझ्या आयुष्यातली सर्वात सोपी गोष्ट होती. तुझ्यासोबत उर्वरित जीवन घालविण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही.' अशी पोस्ट आलियाने केली होती. (Latest Entertainment News)

आलियाने खूप कमी वयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया २२ वर्षाची आहे. तर शेन २३ वर्षाचा आहे. आलिया ब्लॉगरअसून ती खूप प्रसिद्ध आहे. तिने बॉलिवूड चित्रपटामध्ये काम देखील केले आहे. शेन आणि आलिया यांची ओळख डेटिंग अॅपवर झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT