Leslie Phillips Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Leslie Phillips: हॅरी पॉटरमधील 'सॉर्टींग हॅट'चा आवाज हरपला, स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन

सोमवारी रात्री झोपेतच लेस्ली यांचे निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Leslie Phillips Death: हॅरी पॉटरच्या फॅन्ससाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॅरी पॉटर चित्रपटामध्ये महत्वाचे पात्र साकारणारे ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाले आहे. लेस्ली फिलिप्स हे ९८ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराची होते.

लेस्ली फिलिप्स यांचे एजन्ट जोनाथन लॉयड यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी सांगितली आहे. जोनाथन लॉयड यांनी सांगितले की, सोमवारी रात्री झोपेतच लेस्ली यांचे निधन झाले. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने त्यांच्या फॅन्सला खूप दुःख झाले आहे. (Actor)

लेस्ली फिलिप्स यांचा जन्म २० एप्रिल १९२४ रोजी लंडन येथे झाला होता. त्यांनी २००हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही आणि रेडिओवर सुद्धा काम केले होते. तसेच हॅरी पॉटर टीम कडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

हॅरी पॉटर चित्रपटातील 'द सॉर्टींग हॅट'ला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. हॅरी पॉटर चित्रपटामुळे लेस्ली फिलिप्स तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले. हॅरी पॉटर चित्रपटाव्यतिरिक्त लेस्ली फिलिप्स यांनी त्यांच्या 'कॅरी ऑन' चित्रपटामुळे देखील प्रसिद्धी मिळाली. कॅरी ऑन चित्रपटातील लेस्ली फिलिप्स यांच्या फ्रेजेस लोकांना खूप आवडल्या होत्या. त्यांचे आयकॉनिक वन लायनर चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : कढीपत्ता फेकून देण्याची चूक करू नका! 'या' पद्धतीने बनवा घरगुती तेल, केस होतील घट्ट आणि लांबसडक

Today's Horoscope : शनिदेवाची कृपा राहणार, या राशिंवर पडणार पैशांचा पाऊस; वाचा शनिवारचे राशिभविष्य

Todays Horoscope: या 5 राशींवर आज पडणार पैशांचा पाऊस, घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा राशीभविष्य!

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?

Agriculture Scam: कृषी साहित्यात कोट्यवधींचा घोटाळा, शेतकऱ्यांच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; 21 कोटी लाटणाऱ्या 15 अधिकाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT