Cannes Festival-Ashok Saraf saam tv
मनोरंजन बातम्या

Cannes Festival-Ashok Saraf : 'कान्स'मध्ये मराठीचा डंका! अशोक मामांनी केली हटके एन्ट्री, निवेदिता सराफ यांच्या लूकने वेधले लक्ष | VIDEO

Cannes 2026 Ashok Saraf-Nivedita Saraf Red Carpet Look: 'कान्स फिल्म फेस्टिवल २०२६' मराठी कलाकारांनी गाजवले. कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी हटके स्टाइलने एन्ट्री घेतली. ज्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या 'कान्स फिल्म फेस्टिवल २०२६' सुरू आहे.

कान्स फिल्म फेस्टिवल २०२६' मध्ये मराठी कलाकारांचा डंका

अशोक मामा आणि निवेदिता सराफ 'कान्स' च्या रेड कार्पेटवर पोहचले.

सध्या सर्वत्र कान्स चित्रपट महोत्सवाची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड, हॉलिवूडसोबतच मराठी कलाकारांची मांदियाळी देखील कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाली. ७९ वा 'कान्स फिल्म फेस्टिवलला मराठीतील महाराष्ट्राची आवडती जोडी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एन्ट्री घेतली. कान्सच्या रेड कार्पेटवर हा ऐतिहासिक क्षण रंगला. या गोड क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'कान्स फिल्म फेस्टिवल' साठी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी खास मराठमोळा लूक केला होता. मराठी संस्कृती जपत त्यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवले. अशोक मामा रेड कार्पेटवर येताच त्यांनी हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मामांनी पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट घालून साधा-सिंपल पारंपरिक लूक केला होता. तर निवेदिता सराफ यांनी सुंदर पैठणी नेसली होती. पारंपरिक दागिने, केसांत गजरा माळून त्यांनी मराठमोळा साज श्रृंगार केला होता.

अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी एकमेकांचा हात धरून रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. त्यांचा हा क्यूट रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. अशोक मामा आणि निवेदिता सराफ हे मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील पावर कपल आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी, चाहते, कलाकार भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अशोक मामांवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

'कान्स फिल्म फेस्टिवल २०२६' मध्ये कोण कोण मराठी कलाकार दिसले

  • ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

  • ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ

  • पुष्कर जोग

  • प्राजक्ता माळी

  • अंकिता वालावालकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हरचा धोकादायक ओव्हरटेक, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरणार?

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT