Drishyam Movie
Drishyam Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam Remake In Korea: दृश्यम जगातभारी! कोरियन मंडळींनाही भुरळ; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मोठी घोषणा

Priya More

Drishyam Movie: बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री तब्बूच्या 'दृश्यम' चित्रपटाला (Drishyam Movie) भारतीयांनंतर कोरिअन मंडळींना भुरळ पडली आहे. या चित्रपटाच्या नावावर आता आणखी एका यशाची भर पडणार आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाचा कोरियन रिमेक होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2023) याची घोषणा करण्यात आली.

भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजी स्टुडिओने या चित्रपटासाठी भागीदारी केली आहे. भारतीय चित्रपटाचा कोरियन भाषेत रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'दृश्यम' चित्रपट पहिला मल्याळम भाषेत 2013 मध्ये तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत होते. आतापर्यंत हा चित्रपट 7 भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन परदेशी भाषांचाही समावेश आहे. आता तो आठव्यांदा कोरियन भाषेत तयार केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'दृश्यम' कोरियन भाषेत तयार करण्यात येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजी स्टुडिओने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत घोषणा केली आहे. पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजीने कोरियामधील दृष्यम फ्रँचायझीचा रीमेक करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली. यावेळी निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. या चित्रपटात 'पॅरासाइट' अभिनेता सॉन्ग काँग हो अभिनय करणार असून दिग्दर्शक किम जी वून असणार आहे.

अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरगोस प्रतिसादानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 'दृश्यम 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजे 'दृश्यम 3' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दृश्यमचा हिंदी रिमेक 2015 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि ऋषभ चढ्ढा हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. निशिकांत कामत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट 38 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला होता आणि त्याने जगभरात 111 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचा दुसरा भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

SCROLL FOR NEXT