Zara Hatke Zara Bachke Promotion At Rajasthan: भाजी - भाकर आणि राजस्थानी लोकांचं ढीगभर प्रेम, विकी - साराचा 'जरा हटके' Video Viral

सारा अली खान विकी कौशल यांनी राजस्थानातील रामसर येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.
Sara Ali Khan And Vicky Kaushal Promotion At Rajasthan
Sara Ali Khan And Vicky Kaushal Promotion At Rajasthan Instagram

Sara Ali Khan And Vicky Kaushal Promotion At Rajasthan: विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हे दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सध्या ते प्रमोशननिमित्त राजस्थानातील रामसर येथे आहेत. प्रमोशननिमित्त विकी आणि सारा दोघेही भारत दौरा करत आहेत.

Sara Ali Khan And Vicky Kaushal Promotion At Rajasthan
Anupam Kher injured : अनुपम खेर यांच्यासोबत घडलं अघटित; चित्रपटाच्या शूटिंगवेळी जखमी

विकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत, ते दोघेही एका घरात बसलेले दिसत आहेत. प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या या जोडीने खास राजस्थानी पेहराव केला आहे. साराने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे, तर विकीने राजस्थानची पगडी घातली आहे. दोघांचाही हा पेहराव सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला.

विकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिले की, “गॉसिप सेशन, १७० सदस्य परिवार असलेलं हे कुटुंब, जितके मोठे कुटुंब तेवढे मोठे आपले हृदय, दिल से राम राम है आप सबको...” म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली. यावेळी राजस्थानच्या महिलांनी दोघांनी भाजी आणि भाकर खाण्यासाठी दिली होती. दोघांनीही त्यांच्या जेवणाचा अस्वाद घेतला. त्यांच्या जेवणार दोघांनीही तुम्ही उत्तम जेवण बनवलं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्या महिलांच्या चेहेऱ्यावरचा आनंद खूप काही सांगुन जात होता. (Bollywood Film)

Sara Ali Khan And Vicky Kaushal Promotion At Rajasthan
Vicky And Sara Angry Viral Video: साराने सर्वांसमोर चिडून मारली विकीला लाथ, विकीनं असं नेमकं काय केलं? Video Viral

व्हिडीओ पाहून युजर म्हणतात, ‘पहिल्यांदाच अनोखी प्रमोशनची ही स्ट्रेटेजी आहे, खूपच मस्त’ असं म्हणत एका युजरने कमेंट केली आहे. ‘१७० सदस्य एकाच कुटुंबासारखे राहतात, हे पाहून खूप छान वाटलं, दोघांनीही खूप छान संवाद साधला.’ असं म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तर काही युजर्सने विकीच्या राजस्थानी पगडीचे ही कौतुक केले. (Entertainment News)

सध्या या दोघांचा ही हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. विकी कौशल आणि साराचा हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होत असून ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नुकताच साराने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. या वर्षी तिने पहिल्यांदा फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. सध्या तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com