Anupam Kher injured : अनुपम खेर यांच्यासोबत घडलं अघटित; चित्रपटाच्या शूटिंगवेळी जखमी

Anupam Kher Post: अभिनेते अनुपम खेर यांना विजय 69 या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे.
Anupam Kher's injury on Vijay
Anupam Kher's injury on Vijay Instagram @anupampkher

Anupam Kher Got Injured During Vijay 69: जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना विजय ६९ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या खांद्याला लागलो आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

अनुपम खेर यांनी खांद्याला आणि हाताला पट्ट्या असलेला फोटो शेअर करत लिहिले आहे, 'तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता असाल आणि तुम्हाला दुखापत झाली नाही!! हे कसे शक्य होईल? काल #Vijay69 च्या शुटींग दरम्यान खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. (Latest Entertainment News)

Anupam Kher's injury on Vijay
'Fast X' Box Office Collection: 'फास्ट अँड फ्युरियस 10'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; तीन दिवसात केली कोट्यवधींची कमाई

खूप दुखत होत पण खांद्याला स्लिंग लावणाऱ्याने जेव्हा सांगितले की शाहरुख खान आणि हृतिक रोशनच्या खांद्यांना त्यानेच स्लिंगने सजवले होते, तेव्हा दुखणं थोडं कमी झालं.

पण जर मला थोडा जोरात खोकला आला तर माझ्या तोंडातून एक किंकाळी नक्कीच येते! फोटोत हसण्याचा केलेला प्रयत्न खरा आहे! एक-दोन दिवसांनी शूटींगला सुरूवात केली.. बाय द वे, हे ऐकून आई म्हणाली, “अजून दाखव जगाला तुझी बॉडी! तुला नजर लागली आहे!” यावर मी उत्तर दिले "आई! युद्धाच्या मैदानात फक्त योद्धेच पडतात. वो तिफल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले!” आई मारता मारता थांबली!

अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये त्याला हेअर लाईन फॅक्चर झाले असल्याचे सांगितले आहे. तसेच आता ते ठीक आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. अनुपम यांच्या या पोस्टवर नीना गुप्ता यांनी 'हे काय केलं' अशी कमेंट केली आहे' तर गुरु रंधावा आणि निल नितीन मुकेशने 'गेट वेल सून' अशी कमेंट केली आहे. अनुपम यांचे अनेक चाहते त्यांने लवकर बरे व्हा म्हणत प्रार्थना करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com