Rajit Kapur Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhatrapati Sambhaji: 'पहिल्यांदाच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली', रजित कपूर साकारणार औरंगजेबाची भूमिका

Rajit Kapur: ‘ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Movie:

‘ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे. परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि कपटी होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ शकतील यामुळे त्यांना ही संधी दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह दुलगज यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर म्हणाले की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे. (Latest Marathi News)

रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' चित्रपटात आहेत.

'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT