Shaad Ali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaad Ali: चित्रपट येण्यापूर्वीच कथा चोरीला ; प्रसिद्ध दिग्दर्शकाची कोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

Shaad Ali News : बंटी और बबली' या चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shaad Ali Case :

'बंटी और बबली', 'साथिया' आणि 'ओके जानू' या चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शाद अलीने त्याच्या चित्रपटाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्याने कोर्टात धाव घेतली आहे. शाद अलीने त्याच्या जुन्या सहकाऱ्यावरच हा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर शाद अलीच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. शादने ज्यांच्यावर आरोप केला आहे त्या प्रॉडक्शन हाउसमध्येही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शकाने स्क्रिप्ट चोरीच्या प्रकरणी पोलिस ठाण्यानंतर आता थेट कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याने जुन्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाद अलीने याचिकेत म्हटलं आहे की, 'त्या दोघांनी माझी स्क्रिप्ट चोरून ती रायटर्स असोसिएशनकडून रजिस्टर देखील करुन घेतली.' (Latest Entertainment News In Marathi)

दिग्दर्शकाच्या वकिलाने यासंबंधित कोर्टात सांगितले की, 'माझ्या अशिलाने गेल्या अनेक वर्षांपासून त्या स्क्रिप्टवर काम केले होते. ही स्क्रिप्ट त्यांनी दोन सहकाऱ्यांना वाचून दाखवली होती. या दोघांनी त्यांना स्क्रिप्टमध्ये सुधारणा करण्यासही सांगितले होते. यासाठी त्यांना ९० हजार रुपयेही दिले होते. जेव्हा त्यांनी त्या दोन व्यक्तींकडे स्क्रिप्टविषयी विचारणा केली तेव्हा त्यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. तसेच काही लोकांकडून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच शाद अलीने आता या दोघांना कोर्टात खेचले आहे.'

शादच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 'बंटी और बबली', 'साथिया' आणि 'ओके जानू' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मिस्टर मम्मी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

Actress Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्रीने स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लपवले, कारण सांगत म्हणाल्या, 'काम मिळण्यासाठी...'

Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

High Cholesterol: नाश्त्यातील 'हे' ५ आवडीचे पदार्थ वाढवतात कोलेस्टेरॉल; हृदय निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

Farmer Loan : मोठी अपडेट! कर्जमुक्ती योजनेतील दोन लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT