Boyz 4 Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boyz 4 Movie :'बॉईज 4' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज; कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या

Boyz 4 On OTT Platform: 'बॉईज 4' चित्रपट आता घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boyz 4 Released On OTT Platform:

'बॉईज 4' चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चित्रपटात सर्वांचीच मने जिंकली आहेत. मराठीत बॉइज हा पहिला चित्रपट आहे ज्याचे 4 भाग आले आहे. चित्रपटाने बक्कळ कमाईदेखील केली आहे.

अनेक लोकांनी 'बॉईज 4' थिएटरमध्ये जाऊन पाहिला. परंतु ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी ही माहिती. 'बॉईज 4' चित्रपट आता घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

'बॉईज 4' ओटीटीवर प्रदर्शित

प्रेक्षकांना आता घसबसल्या 'बॉईज 4' चित्रपट पाहता येणार आहे. 16 नोव्हेंबरला हा चित्रपट ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. यामुळे प्रेक्षक आता घरबसल्या सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

'बॉईज 4' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने 10 दिवसात ४.२० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांना भूरळ घातलीये असं म्हणायला हरकत नाही.

'बॉईज 4' चित्रपटात अनेक कलाकार झळकले होते. चित्रपटात काही नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहेत. सुंमत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडसोबत अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे मुख्य भूमिकेत झळकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT