Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Photo: रश्मिका आणि विजयच्या फोटोंची सोशल मीडियावर एकच चर्चा; एका चष्म्यामुळे चर्चेला जोर

रश्मिकाचे सध्या मालदिवमधील सुट्टीचा आनंद घेणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, सोशल मीडियावरील तरूणांची क्रश म्हणून प्रसिद्ध असलेल्या रश्मिकाने (Bollywood Actress) बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'गुड बाय' चित्रपटातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सध्या तिच्या 'गुड बाय' चित्रपटानिमित्त प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. (Bollywood Movie)

तिचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने आपल्या व्यस्त कामातून मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये रश्मिका एकटी दिसत असून तिच्यासोबत मालदिवमध्ये विजय देवरकोंडाही असल्याचे चाहत्यांना वाटत आहे. ते दोघेही एकत्र सुट्टीचा आनंद लुटत असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. कदाचित तिचा फोटो विजय काढत असल्याचेही बऱ्याच जणांनी तर्कवितर्क लावले आहेत.

रश्मिकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती एका पुलाच्या बाजुला बसून ब्रेकफास्टचा आनंद लुटताना दिसत आहे. त्या फोटोतील रश्मिकाच्या डोळ्यांवरचा काळा चष्मा विजयचा असल्याचा चाहत्यांचे म्हणणे आहे. विजयने विमानतळावरील शेअर केलेल्या फोटोत काळा चष्मा दोघांचाही सारखा दिसत आहे.

रश्मिकाची पोस्ट पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावलाय की, रश्मिका मंदान्नाने आपला फोटो क्लिक करण्यासाठी विजय देवरकोंडाचा चष्मा घेतला आहे. यावरून रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा मालदीवमध्ये एकत्र असल्याचे स्पष्ट होते. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

SCROLL FOR NEXT