Fashion Designer Cheating Case Saam tv
मनोरंजन बातम्या

Fashion Designer Cheating Case: प्रसिद्ध डिझायनर अडचणीत, हायकोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fashion Designer Cheating Case: लिबास ब्रँडचे डिझायनर रियाज गांजी याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. थकबाकी आणि न्यायालयीन आदेश न पाळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Fashion Designer Cheating Case: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रियाज गांजी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालय यांनी अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्यात आले आहे. ‘लिबास’ या प्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक असलेल्या रियाज गांजी यांच्यावर थकबाकी न भरल्याचा आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याचा गंभीर आरोप आहे.

ही कारवाई अवमान याचिकेअंतर्गत करण्यात आली असून, लुधियानास्थित एका रिअल इस्टेट कंपनीसोबतच्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या वादातून हे संपूर्ण प्रकार सुरु झालं आहे. संबंधित कंपनीने आरोप केला आहे की, गांजी आणि त्यांच्या कंपनीने आर्थिक व्यवहारांमध्ये डिफॉल्ट केला आणि न्यायालयीन आदेश असूनही पैसे पूर्ण दिले नाहीत.

न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, रियाज गांजी यांनी वारंवार संधी देऊनही त्याने थकबाकी भरली नाही. तसेच, त्यांनी न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्यात सातत्याने दुर्लक्ष केले. या वर्तनावर कठोर शब्दांत टीका करत न्यायालयाने म्हटले की, “त्यांच्या वर्तनाला कोणतीही सहानुभूती किंवा दया मिळणार नाही.”

या प्रकरणात गांजी न्यायालयात उपस्थित राहण्यासही टाळाटाळ करत असल्याचे आढळले. त्यामुळेच न्यायालयाने मुंबई पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे.

याशिवाय, न्यायालयाने गांजी, त्यांची कंपनी ‘लिबास डिझाइन्स’ आणि संबंधित संचालकांना कोणत्याही प्रकारची मालमत्ता विकणे किंवा हस्तांतरित करण्यासही मनाई केली आहे. न्यायालयाच्या मते, मालमत्तेची अपुरी माहिती देण्यात आल्यामुळे पुढील कायदेशीर कारवाईत अडथळे निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

Heart Attack: हार्ट अटॅक येणारे हे लवकर कसं ओळखाल? 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये दाखल, आंदोलनाला सुरुवात

पैशांची चणचण दूर करेल पिवळ्या चपातीचा 'हा' सोपा उपाय, महिनाभरातच व्हाल धनवान

SCROLL FOR NEXT