Sanjay Chauhan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Chauhan: 'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन

संजय चौहान यांनी १२ जानेवारीला मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Pooja Dange

Sanjay Chauhan Passes Away: मनोरंजन सृष्टीसाठी एक दुःखद बातमी आहे. 'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. संजय चौहान यांनी १२ जानेवारीला मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. संजय लिव्हर संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांचे मागे त्यांनीही पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे.

संजय चौहान यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले आहे. संजय चौहान 'पान सिंह तोमर' व्यतिरिक्त तिग्मांशू धूलियासह 'साहेब बीवी गँगस्टर' हा चित्रपट सुद्धा लिहिला आहे. 'आय एम कलाम' या चित्रपटासाठी त्यांना 'बेस्ट स्टोरी'साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. 'मैने गांधी को नाही मारा' आणि 'धूप' हे काही त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट आहेत.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये जन्मलेल्या संजय चौहानचे वडील रेल्वेत काम करत होते आणि त्यांची आई शिक्षिका होती. संजय चौहान यांनी दिल्लीतून पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनी टीव्हीसाठी गुन्हेगारीवर आधारित मालिका 'भंवर' लिहिल्यानंतर ते 1990 मध्ये मुंबईत आले. आज दुपारी 12.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत संजय चौहान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT