Neena Gupta Talks About Her Career Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा

Neena Gupta Talks About Her Career : अभिनेत्री नीना गुप्ता यांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. आपल्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नीना गुप्ता यांची गणना केली जाते. सध्या नीना गुप्ता ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्रीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, आपल्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल भाष्य केले आहे.

१९८२ पासून अभिनेत्री नीना गुप्ता इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. आज जरीही त्या फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरीही त्यांच्यासाठी स्ट्रगलचे दिवस फार कठीण होते. नुकतंच अभिनेत्री स्ट्रगलच्या दिवसांबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

नीना गुप्ता मुलाखतीमध्ये म्हणाल्या, "माझे स्ट्रगलचे दिवस खूपच कठीण होते. मी दिल्लीतून मुंबईमध्ये आले होते. जेव्हा मी मुंबईमध्ये आले त्यावेळी मला हे शहर खूप अवघड वाटायचे. मी काही दिवसातच पुन्हा दिल्लीला जायच्या विचारात होते. मी शिकलेली होती, त्यामुळे दिल्लीत जाऊन पीएचडी करण्याच्या विचारात होते. पण मुंबईमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी फार स्ट्रगल आहे."

पुढे मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, "मुंबईतून जायचा विचार जरीही करत असले तरीही मला एका रात्रीत कोणी तरी काम देऊन थांबवण्याचा प्रयत्न करतं. असं माझ्या सोबत अनेकदा घडलं आहे." नीना गुप्ता यांचा फिल्मी प्रवास फार प्रेरणादायी ठरला आहे. त्यांचा चढ उतार अनेक चढ उतारांनी भरलेला होता. मी करियरच्या अशा वळणावर होते, जिथे मी अनेक भूमिकेंसाठी नकार दिलेला आहे, असं मुलाखतीत नीना गुप्तांनी सांगितलं आहे.

माझ्यामध्ये हा बदल वेळेप्रमाणे झालेला आहे. पदरी काही तरी काम मिळेल या आशेने मी मुंबईमध्ये राहिले. स्ट्रगलच्या दिवसांत मला पैशांची गरज होती, त्यामुळे मला बी- ग्रेडच्या भुमिका करायला लागल्या होत्या. हा चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी मी अनेकदा देवाकडे प्रार्थना करायची. आता मी तशा भूमिकांना नकार देते, पण पूर्वी नकार देत नव्हते. ज्या चित्रपटाची स्टोरी मला आवडते, तोच चित्रपट मी करते, अन्यथा मी नकार देते. असं मुलाखतीमध्ये नीना म्हणाल्या.

अनेकदा नीना यांना ट्रोलर्स 'बोल्ड अभिनेत्री'ही म्हणून बोलतात, त्यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. "मी वेगवेगळ्या धाटणीचे रोल केलेले आहे. पण, मला माहित नाही तो टॅग कसा पडला. माझी तशी प्रतिमा मीडियाने तयार केलेली आहे." सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीने 'पंचायत ३'मध्ये प्रधानजींच्या पत्नीची म्हणजे, मंजू देवीची भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजमधील अभिनयाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

SCROLL FOR NEXT