Prodcuer Opens Up Mirzapur 3 Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Release Date: कालीन भैय्या- गुड्डू भैय्या भिडणार!; ‘मिर्झापूर ३’च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट

Mirzapur 3 Release Date Update: मोस्ट अवेटेड ‘मिर्झापूर ३’ वेबसीरिजची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. सीरिज कधी रिलीज होणार याबद्दलची माहिती निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे.

Chetan Bodke

Prodcuer Opens Up Mirzapur 3 Release Date

‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरीजची कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर ३’ची घोषणा करण्यात आली होती. सध्या ह्या मोस्ट अवेटेड वेबसीरिजची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज कधी रिलीज होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. वेब सीरिजचे निर्माते रितेश सिधवानी यांनी रिलीजबद्दल मोठी अपडेट दिली आहे. (Bollywood)

या वेब सीरिजचा दुसरा सिझन २०२० मध्ये रिलीज झालेला होता.‘मिर्झापूर’, ‘मिर्झापूर २’ला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर निर्मात्यांनी या वेबसीरिजचा तिसरा भाग चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या वेबसीरिजची शूटिंग संपली आहे. आता फक्त ही वेबसीरिज प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. (Web Series)

या वेब सीरिजचे निर्माते रितेश सिधवानीने ‘मिर्झापूर ३’च्या रिलीजबद्दल मोठी अपडेट दिली आहे. निर्मात्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “ ‘मिर्झापूर ३’ वेबसीरीज रिलीजचे काम आमच्याकडे नाही. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ ही वेबसीरीज प्रदर्शित करेल.

जून २०२४ किंवा जुलै २०२४ मध्ये ही वेबसीरिज रिलीज होण्याची शक्यता आहे.” पण या वेबसीरिजच्या रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या ४ वर्षांपासून चाहते या वेबसीरिजबद्दल खूपच उत्सुक आहेत. (OTT)

वेब सीरिजचे निर्माते रितेश सिधवानीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “दुर्दैवाने मुन्ना त्रिपाठी पुन्हा सीरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण कथेमध्ये प्रेक्षकांना ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने तो कमबॅक करणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरेल. प्रेक्षकांना त्याच्या कमबॅकसाठी थोडी वाट पाहावी लागेल.” मात्र, मुन्ना मालिकेमध्ये कसे कमबॅक करणार याबाबत निर्मात्यांनी काहीही सांगितले नाही. (Bollywood News)

निर्मात्यांच्या ह्या वक्तव्यामुळे ‘मिर्झापूर ३’ ही वेबसीरिज वर्षाच्या मध्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा होत आहे. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स कथानक असलेल्या ‘मिर्झापूर’ वेबसीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये रिलीज झाला होता.

प्रेक्षकांच्या मागणीनंतर आणि मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर २०२० मध्ये या वेबसीरिजचा हा दुसरा सीझन रिलीज झाला. आता चाहत्यांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता आहे. ‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर २’ मध्ये प्रमुख भूमिकेत, कुलभूषण खरबंदा, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, दिवेंद्रू शर्मा, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, शीबा चड्ढा, हर्षिता गौर, श्रिया पिळगावकर, विजय वर्मा, लिलीपुटसह आदी कलाकार आहेत. आता तिसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत कोण कोणते नवीन चेहरे दिसणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT