Box Office Collection Report Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: बॉलिवूड अन् हॉलिवूडमध्ये काटें की टक्कर; 'बागी 4', 'द बंगाल फाइल्स', 'द कॉन्ज्यूरिंग' कोणी मारली बाजी?

Box Office Collection Report: बॉलिवूडमधील टायगर श्रॉफचा अॅक्शनपट ‘बागी 4’ आणि विवेक अग्निहोत्री यांचा राजकीय नाट्यपट ‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित झाला आहे. तर, हॉलिवूडमधील ‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राइट्स’ या हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Shruti Vilas Kadam

‘बागी 4’ची जोरदार ओपनिंग

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’ ला मिश्र प्रतिसाद

‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राईट्स’ प्रेक्षक पसंती चित्रपट

Box Office Collection: बॉलिवूडमध्ये एकीकडे टायगर श्रॉफचा अॅक्शनपट ‘बागी 4’ आणि विवेक अग्निहोत्री यांचा राजकीय नाट्यपट ‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित झाला आहे, तर हॉलिवूडमधून आलेल्या ‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राइट्स’ या हॉरर चित्रपटाने थेट भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिन्ही चित्रपटांचे विकेंड बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर झाले असून हॉलीवूडच्या चित्रपटाने बॉलिवूडच्या मोठ्या रिलीजलाही मागे टाकले आहे.

टायगर श्रॉफच्या ‘बागी 4’ने पहिल्या दिवशी तब्बल 12 कोटींची ओपनिंग केली. मात्र दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली आणि या चित्रपटाने 9.25 कोटींचं कलेक्शन केलं. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी 10 कोटी मिळाले. तीन दिवसांत चित्रपटाने एकूण 31.25 कोटींची कमाई केली.

दुसरीकडे, विवेक अग्निहोत्रींचा ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी केवळ 1.75 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.75 कोटींची कमाई केली. विकेंडचे एकूण कलेक्शन 6.65 कोटी इतकेच झाले आहेत. पश्चिम बंगालमधील बंदीमुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

याउलट हॉलिवूडचा ‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राइट्स’ भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 18 कोटींची कमाई करून सर्वांना थक्क केले. तीन दिवसांच्या अखेरीस या हॉरर चित्रपटाने तब्बल 50 कोटींचा टप्पा गाठला. त्यामुळे विकेंडमध्येच त्याने ‘बागी 4’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT