Vivek Oberoi On Bollywood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi: ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर विवेक 'या' मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा; अशी झाली होती पहिली भेट

अभिनेता विवेक हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: विवेक ओबेरॉय बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्यापैंकी एक आहे. अभिनेता हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. विवेकने त्याच्या चंदेरी दुनियेतील कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपटे दिली आहेत. मात्र विवेक हा त्यांच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांच्या चांगलाच आठवणीत आहे. एक काळ होता की विवेकचे नाव ऐश्वर्या रायसोबत जोडले होते. मात्र आता विवेक पत्नी प्रियांका अल्या सोबत आंनदी आयुष्य जगत आहेत.आजपासून बरोबर १२ वर्षे आधी म्हणजेच२९ ऑक्टोबर २०१० रोजी विवेक आणि प्रियांकाने त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. दोघांच्या लग्नाला आज १२ वर्षे झाली असून आज दोघेही एकत्र एन्जॉय करत आहेत. या खास दिवशी आपण विवेक आणि प्रियांका यांच्या प्रेमाविषयी जाणून घेऊ या.

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचे नाते कोणापासून लपलेले नाही. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण सलमान खानला दोघांचे नाते आवडले नाही आणि एकदा सलमानने विवेकला धमकीही दिली होती, त्यानंतर दोघेही वेगळे झाले. ऐश्वर्यानंतर विवेकचे नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाही. इतकंच नाही तर विवेक फिल्मी दुनियेतून दूर झाला होता पण त्यानंतर विवेकच्या आयुष्यात प्रियांका आली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला परत सुरूवात झाली.

प्रियांका अल्या ही कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्या यांची मुलगी आहे आणि तिच्या परिवाराने तिची विवेकसाठी निवड केली होती. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेकने आयुष्यात पुढे जावे, अशी विवेकच्या कुटुंबियाची इच्छा होती. यामुळेच त्यानी लवकरच लग्नबंधनात अडकावे यासाठी अट्हास केला होता. मात्र विवेकने आई-वडिलांसमोर एक अट ठेवली होती.

जेव्हा विवेकच्या आईने अभिनेत्याला प्रियांकाला भेटायला सांगितलं तेव्हा तो लंडनला होता आणि प्रियांका इटली फ्लोरेन्समध्ये होती. प्रियांकाला भेटायला जाण्यापूर्वी विवेकने आईसमोर एक अट ठेवली होती. तो म्हणाला की जर त्याला प्रियंका आवडत असेल तर तो आधी तिला एक वर्ष डेट करेल आणि नंतर पुढच्या वर्षी तिच्याशी लग्न करेल. विवेकच्या आईने ही अट मान्य केली आणि विवेक प्रियांकाला भेटण्यासाठी फ्लोरेन्सला गेला. विवेकला प्रियंका इतकी आवडली की त्याने वर्षभरही वाट न पाहता २०१० मध्ये लग्नासाठी होकार दिला आणि दोघेही लग्नबंधनात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: नाईट लाईटमुळे हार्ट अटॅकचा धोका 56%; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

प्रवाशांसाठी खुशखबर! फक्त एका तासात पनवेल टू कर्जत गाठा; रेल्वे कॉरिडॉचं काम अंतिम टप्प्यात

IND vs AUS T20 Series: ODIनंतर आता टी२० चा रंगणार थरार; भारत-ऑस्ट्रेलिया कधी येणार आमनेसामने? जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : बडनेरा मध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

Accident News : रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने उडविले; येवल्यात वाहतूक व्यवस्थेचा बळी

SCROLL FOR NEXT