Gandhi Godse Ek Yudh  Instagram @chinmay_d_mandlekar
मनोरंजन बातम्या

Gandhi Godse Ek Yudh: 'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, चिन्मय मांडेकर दिसणार 'या' भूमिकेत,

'गांधी-गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या माध्यमातून संतोषी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Pooja Dange

Gandhi Godse Ek Yudh Motion Poster Out: भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी ९ वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा चित्रपटाकडे वळले आहेत. 'गांधी-गोडसे एक युद्ध' या चित्रपटाच्या माध्यमातून संतोषी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेवर आधारित चित्रपटाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

'अंदाज अपना अपना'पासून 'फाटा पोस्टर निकाल हिरो'पर्यंत अनेक हिट चित्रपट त्यांनीं दिग्दर्शित केले आहेत. संतोषी नेहमीच उत्तम आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन येत असतात. अशाच एक उत्तम आशय असलेला नाजूक विषय घेऊन ते प्रेक्षकांसमोर येत आहेत.

प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील विचारधारेच्या युद्धाचे चित्रण करण्यात आले आहे. ज्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत. महात्मा गांधींची भूमिका अभिनेते दीपक अंतानी यांनी साकारली आहे, तर चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसत आहे. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतिहासातील इतर प्रमुख पात्रांची झलकही व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Video)

'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाची कथा असगर वजाहत आणि राजकुमार संतोषी यांनी लिहिले आहे. संतोषी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट पीव्हीआर पिक्चर्सद्वारे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला ऑस्कर आणि ग्रॅमी विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. 'गांधी गोडसे एक युद्ध' 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT