Janhvi Kapoor Instagram @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Mili Teaser: जान्हवी कपूर देत आहे मृत्यूशी झुंज, फ्रीजमध्ये अडकलेल्या जान्हवीची होईल का सुटका?

मायनस १६ डिग्रीमध्ये अडकली जान्हवी, यशस्वी होईल का स्वतःचे प्राण वाचविण्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आघाडीतील अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पडली आहे. जान्हवी नेहमीच तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असते. जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांना समोर अशीच एक वेगळी भूमिका घेऊन येणार आहे. तिचा 'मिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्याळम चित्रपट 'हेलेन (2019)' याचा हा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी २४ वर्षीय बीएससी नर्सिंग ग्रॅज्युएट 'मिली नौटियाल'ची भूमिका साकारत आहे.

जान्हवी कपूरने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर 'मिली' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये जान्हवी दाताने टेप तोडत आहे. जान्हवी -१६ डिग्री तापमान असलेल्या फ्रिजमध्ये अडकलेली आहे. त्यानंतर ती फ्रेजचे दार बंद करते. टीझरमध्ये जान्हवी चित्रपटात साकारत असलेल्या भूमिकेच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. टीझर पाहून चित्रपटात थरार पाहायला मिळणार आहे असे दिसते.

'मिली' चित्रपटात जान्हवीसह विकी कौशलचा छोटा भाऊ सनी कौशल आणि मनोज पाहवा दिसणार आहे. बोनी कपूर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शक माथुकुट्टी जेवियर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ए आर रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

जान्हवी कपूर 'दोस्ताना 2' आणि 'बवाल' चित्रपटांमध्ये वरून धवनसह दिसणार आहे. राजकुमार राव आणि जान्हवी हे 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर

ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचं गुपित उघड, नेमकी काय चर्चा झाली?

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने २० लाखांची खंडणी; व्यावसायिकांमध्ये खळबळ, कारवाईत टोळीचं पुणे कनेक्शन उघड

भाजप फुटली, बड्या नेत्याने डाव जिंकला, काँग्रेसच्या पाठिंब्याने थेट सत्ता काबिज

SCROLL FOR NEXT