36 Gunn Trailer: '३६ गुण नाहीतर आकडा जुळलाय...', तरुणांना नवा विचार देणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहावा. नात्यांमध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.
36 Gunn Trailer
36 Gunn TrailerSaam Tv

मुंबई: लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे नेहमीच बोलले जाते. मात्र लग्न जुळवताना पत्रिकेत किती गुण जुळताय हे पाहूनच लग्न ठरवले जाते. पण '३६ गुण' या मराठी चित्रपटात ग्रह तारे, पत्रिका, एका भेटीत सातजन्माच्या गाठी या सर्व विचारांना पार करत नव्या नात्याची सुरुवात करताना कुंडलीपेक्षा एकमेकांचे मत-मतांतरे, विचार जुळणे महत्वाचे आहे. सर्व आधुनिक विचार मांडणारा समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' हा मराठी चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत संतोष जुवेकर, पूर्वा पवार, पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. (Marathi Entertainment News) (Marathi Actors) (Marathi Actress)

36 Gunn Trailer
Jhalak Dikhala Ja: गश्मिरसोबत सिद्धार्थने मराठी गाण्यावर धरला ठेका; डान्स पाहून परिक्षकांच्या खास प्रतिक्रिया

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, आधुनिक आणि बोल्ड असलेल्या या विषयात आजच्या तरुण पिढीला वेगळा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. आजची ही पिढी लग्नव्यवस्थेतील बुरसटलेल्या, किचकट, मानसिक ताणतणावाची प्रक्रिया बदलू पाहते, याची ही झलक आहे. असे म्हणतात, व्यापारात नाती आणि आशा-अपेक्षा आणू नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनाही एकमेकांना समजून, प्रत्येक परिस्थितीला एकमेकांना समजून घेणे, आपल्या जोडीदाराला साथ देणे महत्वाचे आहे. हे चित्रपट पाहिल्यावर प्रभावीपणे दिसत आहे.

36 Gunn Trailer
Fu Bai Fu: झी मराठीवर होणार मनोरंजनाचा डबल धमाका; 'या' कार्यक्रमाचा येणार सिक्वेल

चित्रपटाबद्दल संतोष जुवेकर सांगतो, 'माझी आतापर्यंतची रावडी इमेज बदलणारा हा चित्रपट आहे. वेगळी भूमिका करायला मिळल्याचा नक्कीच आनंद आहे.' तर पूर्वा सांगते की, 'खूप दिवसांनी मी चित्रपटात काम केले आहे, आमचं टीमवर्क तुम्हाला या चित्रपटात दिसेल.' पुष्कर श्रोत्री सांगतो की, 'लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहावा. नात्यांमध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.'

या चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. कॅफे मराठीतील निखील रायबोले व भूपेंद्रकुमार नंदन ने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची असून संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com