Tejasswi Prakash: 'बिग बॉस १५' आणि 'खतरों के खिलाडी १०' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये यापूर्वी सहभागी झालेली तेजस्वी प्रकाश आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतली आहे. यावेळी, ती 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तिचे स्वयंपाक कौशल्य दाखवत आहे. तेजस्वीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट निर्माते रोहित शेट्टीसोबत तिचे नाते फार खास आहे. तिला म्हणते रोहित शेट्टी खूप चांगला व्यक्ती आहे. तेजस्वी म्हणाली, 'तो मला खूप आवडतो आणि आम्ही एकत्र खूप मजा करतो.' तिने असेही म्हटले की रोहित शेट्टीसारखा दुसरा कोणी नाही, तो बेस्ट आहे.
तेजस्वी रोहितबद्दल म्हणाली, 'तो दिसायला जेवढा स्ट्रॉन्ग आहे तेवढाचा सॉफ्ट हार्टेड आहे. तो नेहमीच चांगल्या हेतूने लोकांना मदत करतो.' रोहित शेट्टीबद्दल तिने सांगितले की ती तिच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटली आहे, पण रोहितसारखा माणूस कधीही पाहिला नाही.
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' मध्ये अभिनय
'खतरों के खिलाडी १०' नंतर, तेजस्वीने २०२३ मध्ये रोहित शेट्टीच्या 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या पहिल्या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटात तेजस्वीसोबत करण परबही होता. या चित्रपटाची कथा एका तरुणाच्या आयुष्यातील संघर्ष आणि आनंदाभोवती होती. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी यांनी पवित्रा गांधी आणि विवेक शाह यांच्यासोबत रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली आहे.
सेलिब्रिटी मास्टरशेफमधील तेजस्वीचा प्रवास
तेजस्वी प्रकाशसोबत, निक्की तांबोळी, राजीव अदातिया, गौरव खन्ना, दीपिका कक्कर, अभिजीत सावंत, अर्चना गौतम, फैसल शेख (मिस्टर फैसू), उषा नाडकर्णी, कविता सिंग आणि चंदन प्रभाकर हे सेलिब्रिटी देखील स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभागी होत आहेत. हा शो २७ जानेवारी रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली. आता या शोमध्ये अभिनेत्रीचा प्रवास कसा होईल हे पाहणे बाकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.