Shahrukh khan and salman khan image Saam Tv
मनोरंजन बातम्या

'हा' अभिनेता शाहरुख-सलमान खानला एकत्र चित्रपट करण्यासाठी करणार का तयार?

शाहरुख खान आणि सलमान खान लवकरच एका सिनेमामध्ये सोबत काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान(Shahrukh Khan) आणि दबंग खान(Salman Khan) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या दोन कलाकारांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट या इंडस्ट्रीला दिले आहेत. ज्यांची तुलना करणे खरोखरच कठीण आहे. या दोन कलाकारांनी 'करण अर्जुन' सारखा सुपरहिट चित्रपट एकत्र केला होता. परंतु त्यानंतर ही जोडी पुन्हा कोणत्या चित्रपटात एकत्र दिसली नाही. या दोन खानस् ना पुन्हा एकत्र एका स्क्रीनवर बघण्यासाठी त्यांचे चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे. मात्र लवकरच त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम लागणार आहे. माहितीनुसार, शाहरुख खान आणि सलमान खान लवकरच एका सिनेमामध्ये सोबत काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान एकाच सिनेमात काम करणार आहेत. सलमानच्या 'टायगर ३' आणि शाहरुखच्या 'पठान' या आगामी सिनेमांचा निर्माता आदित्य चोप्रा या दोन्ही सुपरस्टार्सला त्याच्या आगामी सिनेमात एकत्र आणत असल्याचे सांगण्यात आले आहे. 'करण अर्जुन'च्या जोडीसोबत चित्रपट करण्याची बातमी खरी आहे. पण आदित्य चोप्राच्या सिनेमाआधी आणखी एका सिनेमात ही जोडी एकत्र दिसणार आहे.

एका ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार, आमिर खानसोबत 'गजनी' सारखा दमदार सिनेमा बनवणारा दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास एका कथेवर काम करत आहे. ज्यामध्ये त्याला शाहरुख आणि सलमानला एकत्र कास्ट करायचे आहे. या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक आणि दोन्ही सुपरस्टार्सची मिटिंगही झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या मिटिंगसाठी शाहरुख आणि सलमानला एकत्र आणण्यात आमिर खानचा मोठा हात आहे. आमिरने 'गजनी'मध्ये मुरुगदाससोबत काम केले आहे. जेव्हा दिग्दर्शकाला शाहरुख-सलमानला त्याच्या कथेत कास्ट करण्याची कल्पना सुचली तेव्हा त्याने आमिरला सांगितले. आमिरने क्षणाचाही विलंब न करता या तिघांची भेट ठरवण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच दोन्ही स्टार्सना या सिनेमाची पुढील माहिती दिली जाईल आणि त्यानंतर या सिनेमाचे पुढच्या वर्षापासून काम सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan : गुलीगत सूरज चव्हाणचा स्वॅग लय भारी; 'शेकी शेकी' गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

मोठी बातमी! संजय गायकवाडांची कर्मचार्‍याला बेदम मारहाण, शिंदेंच्या शिलेदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

Banana Kofta Recipe: पावसाळ्यात तोंडाला पाणी सुटेल अशी केळी कोफ्ता करी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Horoscope Wednesday Update : महत्वाच्या कामात येईल अडथळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT