Vikram Vedha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: विक्रम वेधानंतर हृतिकचा उत्तम निर्णय, म्हणाला 'चित्रपट सिलेक्शनवर करणार पुनर्विचार...'

'विक्रम वेधा' या चित्रपटात हृतिक रोशन पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

Pooja Dange

Hrithik Roshan On Vikram Vedha: बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्याचा डान्स असो वा अभिनय हृतिक नेहमीच चाहत्यांची मने जिंकतो. 2022 मध्ये 'विक्रम वेधा' या चित्रपटात हृतिक रोशन पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

'विक्रम वेधा' या चित्रपटात हृतिक आणि सैफ या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु असे असूनही 'विक्रम वेधा' बॉक्स ऑफिसवर त्याचे बजेट इतकी कमाई करता आली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हृतिकने या चित्रपट त्याचे मत मांडले आहे. (Hrithik Roshan)

हृतिक रोशनने अलीकडेच त्याच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या फ्लॉपविषयी भाष्य केले आहे. हृतिक यावेळी म्हणाला की, 'विक्रम वेधा रिलीज झाला पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटासाठी मला जस प्रतिसाद मला मिळाला, त्यातून मी काय शिकलो असा प्रश्न माझ्या मनात नक्कीच आहे. अद्याप मला याचे उत्तर मिळाले नाही. पण सध्या मला असं वाटतंय की, लोक मला असे पात्र करताना बघू इच्छित नाहीत. कदाचित मला अशी पात्रे साकारण्याची परवानगी नाही. जिथे मी माझ्या चाहत्यांना पाहिजे ते देऊ शकत नाही. त्यांना मला फक्त एकाच पात्रात बघायचे आहे. जर मला अशी पात्रे साकारायची असतील तर मला त्यांना वेगळा दृष्टीकोन द्यावा लागेल'. (Movie)

हृतिक रोशन पुढे म्हणाला, 'मी आता हे सांगत आहे की माझ्या चाहत्यांना न आवडणारी पात्रे निवडण्यापूर्वी मी दोनदा विचार करेन. पण अर्थातच जेव्हा मी एखादी कथा ऐकतो तेव्हा मी माझ्यातील अभिनेत्याला प्राधान्य देतो आणि जर मला नाही म्हणता येत नसेल तर मी नेहमी हो म्हणतो.'

हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा विक्रम वेध हा चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण केवळ 84 कोटींची कमाई केली. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, जो त्याच नावाने हिंदीत प्रदर्शित झाला होता. तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा गायत्री-पुष्कर यांनी केले होते.

हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो दीपिका पदुकोणसोबत 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे. पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिका स्क्रीन शेअर करणार आहेत. 'पठान' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

SCROLL FOR NEXT