Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ कियाराचं अखेर ठरलं. 'या' तारखेला करणार लग्न...

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.
Kiara Advani and Sidharth Malhotra image
Kiara Advani and Sidharth Malhotra image Instagram @sidmalhotra

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Dates:  बॉलिवूडसाठी २०२२ खूप खास होते. यावर्षी अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकले. तर काहींच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले. येणार वर्ष सुद्धा असेच असणार आहे. बऱ्याच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. गेले काही दिवस कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याची चर्चा आहे. याविषयी एक नवीन बातमी समोर आले आहे. चला तर मी जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची अपडेट.

Kiara Advani and Sidharth Malhotra image
Rishabh Pant: ऋषभच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची हॉस्पिटलमध्ये रिघ...

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि कियारा फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाला कोण असणार, लग्न कुठे होणार याविषयीच्या बातम्यांनी जोर धरला होता. (Siddharth Malhotra)

एका वृत्तपत्राने सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तसेच ही बातमी खरी असल्याचा दावा देखील केला आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा ६ फेब्रुवारी २०२३ला लग्नबंधनात अडकणार आहेत. ४ फेब्रुवारीपासून त्यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. या सर्व कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीय आणि काही खास पाहुणे सहभागी होणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थचे लग्न अत्यंत कटेकोट सुरक्षा व्यवस्थेत राजस्थान येथील आलिशान जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे. (Wedding)

सिद्धार्थ आणि कियारा सध्या नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला गेले आहेत. मनिष मल्होत्राने त्यांचे दुबईतील फोटो शेअर केला आहेत. कियाराचा नुकताच 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. कियारा कार्तिक आर्यनसह 'सत्यप्रेम की कथा' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शेरशाह'नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीची वेबसीरीज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com