Akshay Kumar Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

रियल लाईफ हिरो जसवंत सिंग गिल यांच्यावर आधारित चित्रपटामध्ये दिसणार 'हा' बॉलिवूडचा सुपरस्टार

सुपरस्टार अक्षय कुमार खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांचे वास्तविक जीवन पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshay Kumar Upcoming Movie: अक्षय कुमार आणि पूजा एन्टरटेन्मेंट लवकरच एका भारतीय नायकाचे शौर्य प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांचे वास्तविक जीवन पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहे. जसवंत सिंग गिल यांनी 1989 मध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत सोडवले होते. हे भारतातील पहिले कोळसा खाण कामगार रेस्क्यू ऑपरेशन होते.

भारत सरकारचे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ट्विटरवर दिवंगत गिल यांची आठवण काढली. पडद्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारताना भारावून गेलेल्या अक्षय कुमारने त्यांच्या ट्विटरवर उत्तर देताना आनंद व्यक्त केला. "या कथेसारखी दुसरी कथा असूच शकत नाही!" असेही त्याने म्हटले.

या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार आहे. टिन्नू सुरेश देसाई यांनी यापूर्वी अक्षय कुमारसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट रुस्तममध्ये काम केले होते. पूजा एंटरटेनमेंट, निर्माते वाशु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठ्या आणि अग्रणी चित्रपट निर्मिती कंपनी आहे. पूजा एंटरटेनमेंट स्टुडिओ काही बहुप्रतीक्षित प्रकल्पांना पाठिंबा देत आहे. (Akshay Kumar)

Akshay Kumar Tweet For Sardar Jasawant Singh Gill

याआधी कुली नंबर 1, बीवी नंबर 1, रेहना है तेरे दिल मे, बडे मियाँ छोटे मियाँ, फालतू, जवानी जानेमन अशा दर्जेदार चित्रपटांची पूजा एंटरटेनमेंटने निर्मिती केली आहे. सरदार जसवंत सिंग गिल यांच्या शौर्यावर आधारित अक्षय कुमार अभिनीत हा शानदार चित्रपट पूजा एंटरटेनमेंटचे आणखी एक उदाहरण जे स्टुडिओला प्रेक्षकांसमोर आणायचे आहे. (Bollywood)

अक्षय कुमार अभिनीत पूजा एंटरटेनमेंटचा एज-ऑफ-द-सीट रिअल-लाइफ रेस्क्यू ड्रामा 2023 मध्ये रिलीज होणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

SCROLL FOR NEXT