Kuttey teaser out INSTAGRAM/@arjunkapoor
मनोरंजन बातम्या

Kuttey Teaser: अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'मध्ये दिसणार बॉलिवूडचे दिग्गज कलाकार: चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबाबत अर्जुन कपूर करणार डार्क कॉमेडी.

Pooja Dange

Arjun Kapoor Upcoming Movie: अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट 'कुत्ते'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरसह चित्रपटातील सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक देखील प्रदर्शित झाले आहेत. 'कुत्ते' हा एक डार्क कॉमेडी असलेला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदान, तब्बू नसरुद्दिन शाहसारखे दिग्गज कलाकार आहेत.

'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूरचे म्हणणे आहे की, कलाकारांसाठी अशा चित्रपटातून शिकण्याची एक उत्तम संधी असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते विशाल भारव्दाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज यांनी केले आहे आहे.

'कुत्ते' चित्रपटामध्ये अर्जुन कपूर एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना अर्जुन कपूर म्हणाला की, "मी 'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लोक काय प्रतिक्रिया देणार याची वाट बघत आहे. मला अशी अपेक्षा आहे की प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायला मिळेल. (Arjun Kapoor)

'कुत्ते' हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. मला लव रंजन सारख्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आसमान भारद्वाजसारखा उल्लेखनीय नवोदित दिग्दर्शक, विशाल भारद्वाजसारख्या निर्माता, लेखक आणि संगीतकाराची ओळख झाली. गुलजार साहेबांनी याची गाणी लिहिली आहेत. यासोबत मी या चित्रपटात तब्बू, कोंकणा सेन शर्मा, नसीर सर, कुमुद जी, शार्दुल भारद्वाज आणि राधिका मदन यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांसोबत काम केले आहे. (Celebrity)

माझ्यासाठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव खूप मजेशीर होता. या चित्रपटाच्या माध्यमातून मला खूप काही शिकता आले. असे चित्रपट कोणत्याही अभिनेत्याला खूप काही शिकवून जातात आणि मला वाटते की मी आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 'कुत्ते'च्या ट्रेलरवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. ‘कुत्ते’ 13 जनवरी 2023 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

SCROLL FOR NEXT