Bollywood Singer KK passes away Latest Update in Marathi (ANI) SAAM TV
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध गायक केके यांचे निधन; लाइव्ह कॉन्सर्टनंतर खाली कोसळले

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nandkumar Joshi

कोलकाता: बॉलिवूड (Bollywood) जगतावर पुन्हा एकदा मोठा आघात झाला आहे. प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकातामध्ये एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. कॉन्सर्टनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Bollywood Singer KK passes away)

प्राथमिक माहितीनुसार, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, डॉक्टरांकडून अद्याप याबाबत काही स्पष्ट सांगण्यात येत नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण समजू शकेल. केके हे दोन दिवसांच्या कॉन्सर्टसाठी कोलकातामध्ये आले होते. सोमवारीही त्यांनी एका कॉन्सर्टमध्ये भाग घेतला होता. विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

केके यांच्या निधनानं बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी ट्विट केले आहे. केके यांच्या निधनानं मी दुःखी झालो आहे. त्यांच्या गाण्यांतून मनातल्या प्रत्येक भावना व्यक्त व्हायच्या. त्यांच्या गाण्यांमधून ते नेहमी आठवणीत राहतील, अशा शब्दांत केके यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. गायक जावेद अली यानंही शोक व्यक्त केला आहे. मला धक्काच बसला आहे. केके यांचे निधन झाल्याची माहिती मला मॅनेजरकडून मिळाली, असे जावेद अली म्हणाला. गायक उदित नारायण यांनीही दुःख व्यक्त केलं. लतादीदींनंतर बप्पीदा यांचे निधन झाले आणि आता केके यांनी जगाचा निरोप घेतला. हे जग सोडून जाण्याचे त्यांचे हे वय नक्कीच नव्हते, असे ते म्हणाले.

आपल्या जादुई आवाजानं तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या केके यांनी अनेक भाषांमध्ये गाणी (Bollywood Songs) गायली आहेत. नव्वदच्या दशकात 'यारो' या गाण्यातून ते यशोशिखरावर पोहोचले होते. केके यांची गाणी नेहमीच नवी भासत असत. 'खुदा जाने' सारखी रोमँटिक गाणी, 'इट्स द टाइम टू डिस्को' किंवा 'कोई कहे कहता रहें...' यांसारखी डान्स नंबर्स, तसेच 'तडप तडप के इस दिल से...' यांसारखी त्यांनी गायलेली सॅड सॉंग्ज हृदयाचा ठाव घ्यायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT