Jubin Nautiyal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jubin Nautiyal: प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात, रुग्णालयात केले दाखल

कबीर सिंह चित्रपटातील गाण्याने चाहत्यांना भूरळ घालणारा बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल गुरुवारी घरातील पायऱ्यांवरून खाली पडला असून त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

Chetan Bodke

Jubin Nautiyal: कबीर सिंह चित्रपटातील गाण्याने चाहत्यांना भूरळ घालणारा बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल गुरुवारी घरातील पायऱ्यांवरून खाली पडला आहे.त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सोबतच त्याच्या डोक्याला आणि कपाळालाही जखम झाली आहे. जुबिनला सध्या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जुबिनला झालेल्या दुखापतीनंतर त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या तरी डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताची जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला आहे.

नुकतेच जुबिन नौटियालचे 'तू सामना आये' हे गाणे रिलीज झाले. हे गाणे जुबिन आणि योहानीने एकत्र गायले आहे. गुरुवारी, जुबिन आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले होते. यानंतरच त्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

गायक जुबिन नौटियालने मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले नाव कमवले आहे. सध्या प्रेक्षकांच्या भेटीला त्याचे एका मागोमाग एक गाणेही प्रदर्शित झाले आहे.

२०१४ मध्ये 'सोनाली केबल' हे पहिले गाणे गायले असून त्याने कबीर सिंग मधील 'तुझे कितना चाहें और हम'या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली. यानंतर जुबिनने हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगाली चित्रपटांचे गाणे आपल्या दमदार आवाजाने गायले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT