Hemangi Kavi
Hemangi KaviSaam Tv

Hemangi Kavi: हेमांगी पुन्हा ट्रोल,'पब्लिसिटी साठी काहीही...' बोलणाऱ्यांना अनोखे उत्तर

नुकतीच हेमांगी एका पोस्टवरून ट्रोल झाली असून तिचे हे ट्रोलिंग काही नवीन नाही. हेमांगीने ट्रोलरला खोचक टोला देत प्रत्युत्तर केले आहे.
Published on

Hemangi Kavi: आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांनी चर्चेत असणारी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या बेधडक वक्तव्यांनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आयुष्यातील कोणताही विषय असो किंवा कोणताही सामजिक विषय असुदे, ती रोखठोक मत मांडते. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी हेमांगी आपल्या चाहत्यांसोबत फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येते.

Hemangi Kavi
Kajol Devgan: न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने मौन सोडले, म्हणते 'अभिनयाचा विचार नाही तर...'

तिच्या सोशल मीडियावरील हटक्या पोस्ट्सवरून बऱ्याचदा ती ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते. पुन्हा एकदा हेमांगी एका पोस्टवरून ट्रोल झाली आहे. तिचे हे नेटकऱ्यांकडून ट्रोल होणे काही नवीन नाही. हेमांगीने ट्रोलरला खोचक टोला देत प्रत्युत्तर केले आहे. हेमांगीने नुकताच एक ट्रेंड होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Hemangi Kavi
The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'वर टीका करणाऱ्या नदाव यांची माफी…

सध्या एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर बराच ट्रेंड होत आहे. त्या व्हिडिओत तिने ट्रेंडिंग होत असलेल्या एका म्युझिकवर ठेका धरला आहे. त्यात दोन फ्रेम असून त्यात ती एक म्युझिकची स्टेप करताना दिसत आहे.

एका फ्रेममध्ये लिहिले की, “ही काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते.” तर दुसऱ्या फ्रेममध्ये लिहिले की, “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते.” या दोन्ही ठिकाणी तिने त्या त्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स दिले आहेत.

त्या व्हिडिओला हेमांगीने कॅप्शन दिले की, “इंडस्ट्रीतील काही लोकांच्या, माझ्या कुटुंबातील काही लोकांच्या, काही खास मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, तसंच माझे ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी…अलग से !”

हेमांगीच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच युझर्सने शांत राहत दिलेल्या उत्तराचे कौतुक होत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com