The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'वर टीका करणाऱ्या नदाव यांची माफी…

मुख्य ज्युरी आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर ‘व्हल्गर’ (अश्लिल) आणि ‘प्रोपगंडा’(प्रचारकी) असल्याचं मत त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे.
The Kashmir files Movie
The Kashmir files Moviesaam tv
Published On

The Kashmir Files: गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक पुरस्कार सोहळे रद्द करण्यात आले होते. त्यातीलच एक म्हणजे इफ्फी. सध्या इफ्फीचा निरोप समारंभ बराच चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे, या समारंभात बोलताना मुख्य ज्युरी आणि इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट ‘व्हल्गर’ (अश्लिल) आणि ‘प्रोपगंडा’(प्रचारकी) असल्याचं मत नदाव लॅपिड यांनी आपले स्पष्ट मत मांडले होते.

The Kashmir files Movie
The Kashmir Files: नदाव लॅपिड यांचे इफ्फीतील वादावर मौन सोडले, सांगितले खरं कारण

नदाव लॅपिड यांच्या या विधानावर चित्रपटातील बऱ्याच कलाकारांनी त्यांच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावरही सध्या नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल झाले. भारतातूनही नदाव लॅपिड यांच्यावर टीका टीप्पणी करण्यात येत आहे. तर, इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी लॅपिड यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे म्हणत वादातून काढता पाय घेतला. त्यानंतर आता नदाव लॅपिड यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हणत माफी मागितली आहे.

The Kashmir files Movie
Dance Video : हळदीत बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

एका इंग्रजी संकेतस्थळासोबत नदाव लॅपिड म्हणाले, “द काश्मीर फाइल्स चित्रपटासंबंधित मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. काश्मिरी पंडित आणि त्यांना झालेल्या त्रासाचा अपमान करणे हा माझा मुख्य उद्देश नव्हता. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. परंतू मी माझे मत स्पष्टपणे मांडले होते. कारण तो चित्रपट माझ्यासह अन्य ज्युरी सदस्यांना चित्रपटातील अर्थ वेगळा वाटला. चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरासाठी अयोग्य असल्याचे मी पुन्हा सांगत आहे.”

The Kashmir files Movie
Nora Fatehi: फिफा वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेहीने केला तिरंग्याचा अपमान; चाहत्यांचा संताप अनावर

या सोहळ्यात नदाव लॅपिड म्हणाले होते,“या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला होता. आम्ही खूपच अस्वस्थ झालो होतो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट मतप्रवाहाचा प्रचार करणारा (Propogenda) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे.

एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे खूपच अयोग्य आहे. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचे आहे. मनात कोणतीच शंका न ठेवत कलेसाठी ही चर्चा होणे गरजेचे आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com