Javed Akhtar Buy New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar Bought New Home : गीतकार जावेद अख्तर यांनी जुहूमध्ये खरेदी केलं कोट्यवधीचं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

Javed Akhtar Buy New Home : गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. मुंबईच्या प्रसिद्ध जुहू परिसरात त्यांनी नवीन घर खरेदी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋतुजा कदम, साम टीव्ही

गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. मुंबईच्या प्रसिद्ध जुहू परिसरात त्यांनी नवीन घर खरेदी केलं आहे. जुहू या परिसरात अनेक सेलिब्रिटी राहतात. बिग बी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अजय देवगण आणि काजोल, हृतिक रोशन, अक्षय कुमार, गोविंदा अशा अनेक दिग्गज सिनेकलाकारांची घरं याच परिसरात आहेत.

जुहू परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायटी आहेत. जुहू हा अतिशय गजबजलेला असा परिसर आहे. याठिकाणी समुद्रकिनारा लाभल्याने कायमच गर्दी असते. बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटी जुहू परिसरात राहतात. जुहू हा परिसर ९०च्या दशकात मुंबईकरांच्या पसंतीत उतरला होता. आजही अनेक पर्यटक हे जुहू परिसराला भेट देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे जुहू हे कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं आहे. जुहूमधील घरांना कलाकार, सेलिब्रिटी, नेतेमंडळीयांची पसंती असते. बॉलिवूडमधील अनेक सिनेकलारांची घरं ही जुहूतील किनाऱ्यालगत आहेत. सी-फेसिंग व्ह्यूसाठी विशेष मागणी असते.

याच जुहू परिसरात जावेद अख्तर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध भागात असलेल्या जुहू येथील सागर सम्राट बिल्डिंगमध्ये ही मालमत्ता आहे. जुहू त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी याठिकाणी अनेक चांगले स्पॉट आहेत. त्यामुळे अशा समृद्ध ठिकाणीच आता जावेद अख्तर यांचंही घर आहे.

शेजारच्या परिसरात अनेक आलिशान इमारती आणि सेलिब्रिटींची घरे आहेत. साहजिकच जुहू परिसराचं ग्लॅमर वाढले आहे. ‘स्कवेअर यार्ड्स’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जावेद अख्तर यांनी 111.43 स्क्वेअर मीटरचे 7.76 कोटींचं घर विकत घेतलंय. हे रेडी-टू-मूव्ह-इन अपार्टमेंट असल्याची माहिती आहे. 2 जुलै रोजी पूर्ण झालेल्या या घराच्या व्यवहारात 46.2 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. तर, 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे.

जावेद यांचं जूनं घरंही मुंबईच्या जुहू याच परिसरात होतं. जुन्या अपार्टमेंटजवळच आता जावेद अख्तर यांनी नव्या घराची खरेदी केलेली आहे. जुहू या परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं असल्यामुळे हा परिसर गजबजलेला असतो. त्यांची आलिशान घरं पाहण्यासाठी लोकांची, पर्यटकांची त्यांच्या घराबाहेर गर्दी असते. या कलाकारांची मोठी मोठी घरे आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय बनलेले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार अशी जावेद अख्तर यांची ओळख आहे. गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात यांनी एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. जावेद अख्तर आणि पटकथाकार सलीम खान यांनी प्रेक्षकांना शोले, जंजीर, दीवार असे अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या पटकथा आणि कहाण्या दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT