Kapil Sharma Cafe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma : १ कोटी खंडणी दे नाहीतर...; कॅफेवर गोळीबारानंतर कपिल शर्माला धमकीचा फोन

Comedian Kapil Sharma: बॉलिवूड कॉमेडियन कपिल शर्माला १ कोटींची खंडणीची धमकी देण्यात आली. आरोपीला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली.

Bhagyashree Kamble

  • कॉमेडियन कपिलला १ कोटींची खंडणीची धमकी.

  • आरोपीकडून फोन अन् व्हिडिओंद्वारे धमक्या.

  • आरोपीला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

एक मोठी बातमी बॉलिवूडमधून समोर येत आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कपिल शर्माला तब्बल १ कोटी रूपांची खंडणीची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं तपास करून पश्चिम बंगालमधून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

दिलीप चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिलीप चौधरीने कपिल शर्माला १ कोटी रुपयांची खंडणीची धमकी दिली होती. गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा वापर करून त्यानं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. २२-२३ सप्टेंबर दरम्यान शर्माला अनेक धमकीचे कॉल आले होते.

कपिल शर्माने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास केला. मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगालमध्ये चौधरीला शोधून काढलं. नंतर त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने कुख्यात गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने शर्माला धमकी दिली असल्याची माहिती आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने केवळ धमकीचे फोन कॉल केले नाहीत तर शर्माला धमकी देणारे व्हिडिओ देखील पाठवले. २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान, शर्माला आरोपीकडून सात धमकीचे फोन आले. शिवाय, त्याला दुसऱ्या नंबरवरूनही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT