Rekha-Alia Bhatt On Red Carpet Saam TV
मनोरंजन बातम्या

Rekha-Alia Bhatt On Red Carpet: साडीत खुलले अभिनेत्रींचे सौंदर्य; आलिया भट्ट आणि रेखाची साडी ठरली सगळ्यात भारी

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

Pooja Dange

Dadasaheb Phalke International Film Fest Awards: मुंबईतील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पार पडला. या चित्रपट महोत्सवाला अनुपम खेर, वरुण धवन, तेजस्वी प्रकाश, दुल्कर सलमान, श्रिया सरन, ऋषभ शेट्टीसह अनेक कलाकार उपस्थित होते. आलिया भट्ट आणि दिग्गज अभिनेत्री रेखा यांनीही दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. सोमवारी रात्री आलिया भट्ट आणि रेखा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. आलियाने पांढऱ्या रंगाची नेट एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली होती, तर रेखा बेज आणि गोल्डन शेड्समधील सिल्क साडीमध्ये सुंदर दिसत होती.

आलियाची साडीला सोन्याच्या रंगाचं काठ होता. भरगच्चं फुलांचे भरतकाम आणि सिक्विन वर्क तिच्या साडीवर दिसून आले. आलियाने पदर खांद्यावर मोकळा ठेवला होता. तसेच तिने पांढऱ्या रंगाचाचा डीप नेकलाइन असलेला ब्लाउज घातला होता. त्या ब्लाउजवर देखील एम्ब्रॉयडरी केलेली होती.

आलियाने डायमंड रिंग आणि मॅचिंग स्लीक कानातल्यांसह स्टाइल करण्यासाठी किमान अॅक्सेसरीज निवडल्या. एक सुंदर टिकली, न्यूड गुलाबी लिपस्टिक, थोडासा स्मोकी आय मेकअप आलियाने केला होता.

तर रेखा, नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसणाऱ्या बेज सिल्क साडीत दिसली. तिच्या साडीला देखील गोल्डन काठ थॉट ज्यावर फुलांची नक्षी होती. रेखाने ही पारंपारिक साडी तिच्या सिगनेचर स्टाईलमध्ये परिधान केली होती. त्यावर तिने गोल गळ्याचा सोनेरी रंगाचा ब्लाउज निवडला. त्यावर तिने मोठे झुमके, त्यावर मॅचिंग हातभर बांगड्या, अंगठी, डार्क रेड लाल लिपस्टिक, आयलायनर, हेवी मस्करा, गोल्ड आय शॅडो असा मेकअप निवडला होता.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये मुख्य भूमिकेसाठी आलिया भट्टला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रेखाला तिच्या 'चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी' विशेष पुरस्कारही मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT