Famous Singer  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

Attack On Singer : सुरेल आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्रसिद्ध गायकावर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संगीत विश्वात खळबळ

प्रसिद्ध गायकावर हल्ला

गायकाच्या गाडीवर गोळीबार

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकावर हल्ला करण्यात आला असून त्याच्या गाडीवरच गोळीबार झाला आहे. तसेच फायरिंगनंतर आगही लागली आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे 'रॉजर्स फोरम'मधील परफॉर्मन्सनंतर काही वेळातच शनिवारी रात्री उशिरा पंजाबी गायक आणि अभिनेता ॲमी विर्क (Ammy Virk) च्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे.

indianexpress च्या वृत्तानुसार, ॲबॉट्सफोर्ड पोलीस विभागाने या गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला असून, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले आहे. रात्री ११ च्या सुमारास, ॲबॉट्सफोर्डमधील मॅकलम रोडच्या २५००-ब्लॉक परिसरातून जाणाऱ्या एका कारवर गडद रंगाच्या एसयूव्ही (SUV) मधील व्यक्तींनी गोळीबार केला.त्यानंतर काही वेळातच, पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सनीसाइड प्लेसच्या २४००-ब्लॉक परिसरात वाहन जळत असल्याच्या एका वेगळ्या घटनेची दखल घेतली. तिथे एक एसयूव्ही होती. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचा तपास अधिकारी आता करत आहेत.

वृत्तानुसार, टार्गेट केलेले वाहन विर्क यांच्या कॉन्सर्टशी संबंधित ताफ्याचा भाग होते. गोळीबार झाला तेव्हा विर्क त्या वाहनात होते. रोल्स-रॉयस गाडी असल्याचे बोले जात आहे. या घटनेत सुमारे सात राऊंड गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहनातील व्यक्तींची ओळख उघड केलेली नाही किंवा विर्क यांच्या उपस्थितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तपासकर्त्यांनी प्रत्यक्षदर्शींना आणि ज्यांच्याकडे मॅकलम रोड परिसरात रात्री १०.४५ ते ११.३० या वेळेत, सनीसाइड प्लेस परिसरात रात्री ११ ते मध्यरात्री या वेळेतचे 'डॅशकॅम फुटेज' (गाडीतील कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग) उपलब्ध आहे, अशा व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.विर्क यांच्या '२०२६ युनिटी टूर'च्या कॅनडातील टप्प्यादरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि तपासकर्ते अजूनही या घटनेमागील हेतूचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात बैठकीला सुरुवात

MHADA Lottery : ठाणे, कल्याणमध्ये फक्त २० लाखांत घर, दिवाळीआधी म्हाडाची १००० घरांची लॉटरी निघणार

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

SCROLL FOR NEXT