Bollywood Producers Change Movies Releasing Date Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Upcoming Movies : बॉलिवूड निर्मात्यांची 'नो रिस्क पॉलिसी'; फ्लॉपच्या भीतीमुळे बदलल्या चित्रपटाच्या तारखा

Producer Changes Movie Released Date : मागच्या दोन महिन्यात अनेक चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Pooja Dange

Bollywood Producer Change Movie Dates : सध्या हिंदी चित्रपटांना मोठा फटका बसत आहे. बिग बजेट चित्रपट प्रदर्शित तर होतात.पण बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू फिकी पडते. बॉलिवूडमधील चित्रपटांवर सध्या वाईट काळ सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यातच आता निर्मात्यांनी चित्रपटाला फटका बसेल या भीतीने प्रदर्शनाची तारखाच बदल्या आहेत.

हाताच्या बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडले तर बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपट हिट होताना दिसत नाहीत. त्यामुळे निर्माते थोडे डंख झाले आहेत. चित्रपटाची कमाई व्हावी, त्यांना भरपूर स्क्रीन आणि योग्य वेळ मिळावी यासाठी निर्माते काळजी घेत आहेत. तसेच दोन चित्रपट क्लॅश होऊन नयेत यासाठी निर्मात्यांनी आता चित्रपटाच्या तारखाच बदलल्या आहेत.

मागच्या दोन महिन्यात अनेक चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने कमी स्क्रिन्स आणि पर्यायी कमी कमाई असे निर्मात्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेआता निर्मात्यांनी कोणतीही रिस्क घ्यायची नाही असे ठरवल्याचे दिसत आहे. (Latest Entertainment News)

नुकतंच भारतीय चित्रपट अभ्यासक तरण आदर्शने यांनी चित्रपटाच्या बदलणाऱ्या तारखांचं कारण सांगितले आहे. एखाद्या चित्रपटाने प्रदर्शनीची तारिख बदलली तर त्याचा पुढच्या चित्रपटावरही परिणाम होतो.

'आदिपुरूष' चित्रपट हा जानेवरीमध्ये प्रदर्शित न होता जूनमध्ये झाला. आता जवान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा बिग बजेट चित्रपटामुळे संपूर्ण महिन्यावर परिणाम होतो. संपूर्ण महिनाभर हा चित्रपट चालतो, असे त्यांनी सांगितले.

अॅनिमनल चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनीही चित्रपट प्रदर्शनाच्या बदलणाऱ्या तारखांवर भाष्य केले आहे. 'आम्हाला प्रेक्षकांपर्यंत एक चांगला, परिपुर्ण चित्रपट पोहोचवायचा आहे. दिग्दर्शकाच्या नजरेतील चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा असे आम्हाला वाटतं.'

'फुक्रे ३' आणि मेघना गुलजार यांचा 'साम बहादूर' हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटाची तारीख पुढे धकलण्याबाबत निर्माता रोनी स्क्रूवाला यांनी काहीही विचार केला नसल्याचे सांगितले आहे.

प्रदर्शनाच्या तारखेचा चित्रपटावर काहीही परिणाम होत नाही. आमच्या चित्रपटाच्याही तारखेची घोषणा झाली आहे. पण चित्रपटाचे व्हिएफएक्स आणि पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे प्रदर्शनाच्या तारखा मागेपुढे होत असतात, असे मुराद खेतानी यांनी सांगितले.

चित्रपटाच्या बदललेल्या तारखा

अॅनिमल

रणबीर कपूर-रश्मिकाचा बहुचर्चित 'अॅनिमल' चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांने चित्रपटाची तारीख बदलून १ डिंसेबर करण्यात आली आहे. या दिवशी अक्षय कुमारचा ओह माय गॉड २ प्रदर्शित होणार आहे.

जवान

किंग खानचा बहुचर्चित 'जवान' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २ जून ही होती. पण आता 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ड्रिम गर्ल २

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेचा 'ड्रिम गर्ल २' चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार होता. तर आता चित्रपटाची तारीख बदलून २५ ऑगस्ट करण्यात आली आहे.

फूक्रे ३

वरुण शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंगचा 'फुक्रे ३' हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण आता चित्रपट १ डिंसेबरला प्रदर्शित होणार आहे.

योद्धा

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा जबरदस्त अॅक्शन असलेला चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार होता. पण आता त्याची तारीख बदलून १५ डिंसेबर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT