Cinema Hall Saam Tv
मनोरंजन बातम्या

Weekend Plan : यंदाच्या विकेडला पहा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, प्रेक्षकांची 'या' चित्रपटाला अधिक पसंती

या आठवड्यात प्रेक्षकांना बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन करु शकतात. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट या विकेंडला आपण पाहू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: या आठवड्यात प्रेक्षकांना बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन करु शकतात (Movies). वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट या विकेंडला आपण पाहू शकता. या आठवड्यात बरेच चित्रपट, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चला तर एक नजर टाकूया विकेंड चित्रपट आणि वेबसीरिजवर (Entertainment News) (Bollywood)

गुडबाय (GoodBye)

विकास बहल दिग्दर्शित गुडबाय चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. कौटुंबिक नातेसंबंध तसेच काही प्रमाणात मनोरंजनावर चित्रपट आधारित आहे.

द घोस्ट (The Ghost)

नागार्जुन यांचा अॅक्शनपट चित्रपट आहे. जर आपल्याला अॅक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहावा. चित्रपटाची कथा इंटरपोल एजंट भोवती चित्रीत करण्यात आली आहे. तो एजंट आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलतो हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. अॅक्शन थ्रिलर चित्रपटात नागार्जुन हटक्या अंदाजात दिसत आहे.

गॉडफादर (Godfather)

हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा असला तरी त्यात सलमान खानही छोट्या भूमिकेत दिसून येत आहे. हा एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. मोहनलालच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या तेलुगू चित्रपटात एका नेत्याच्या मृत्यूनंतर राजकीय युद्ध चित्रीत करण्यात आले आहे.

मजा मा (Maja Ma)

माधुरी दीक्षितची 'मजा मा' चित्रपटात वेगळीच भूमिका दिसत आहे. आनंद तिवारीचा हा चित्रपट मध्यमवर्गीय परिवारातील आईभोवती चित्रित करण्यात आला आहे. शुक्रवारपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

टिकीट टू पॅरैडाईज (Ticket To Paradise)

हॉलिवूडमधील 'टिकीट टू पॅरैडाईज' कॉमेडी ड्रामा चित्रपट पाहू शकणार आहेत. ज्यूलिया रॉबर्टस आणि जॉर्ज क्लूने यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात आपल्या मुलीला वाचवण्याचा हे दोघेही प्रयत्न करतात.

वेअरवुल्फ बाय नाईट (Werewolf By Night)

तुम्ही मार्वलची सीरिज पाहिली असेल तर वीकेंडला तुमच्या मनोरंजनासाठी हे अधिक चांगले ठरू शकते. मानवी शरीरात लपलेला राक्षसबाहेर आल्यावर ही कथा फिरते. यामध्ये तुम्हाला रोमांचक आणि थ्रिल दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. तसेच काही विनोदीशैली देखील त्यात समाविष्ट आहे.

प्रे (Prey)

ही चित्रपटाची वैज्ञानिक कथा आहे. अमेरिकेच्या १८ व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात तुम्हाला थरार आणि साहस पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ड्रेन थ्राचेनबर्ग यांनी केले आहे. हा प्रिडेटर फ्रँचायझीचा चित्रपट आहे. शुक्रवारपासून डिज्नी हॉटस्टारवर प्रसारित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT