Article 370 Vs Crakk Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Article 370 Vs Crakk Collection: यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'ने घेतली मोठी झेप, 'क्रॅक'च्या कमाईत दुसऱ्याच दिवशी घसरण

Priya More

Article 370 Vs Crakk Box Office Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) 'आर्टिकल 370' (Article 370) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत यामी गौतमच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक होत आहे.

या चित्रपटाचे फक्त कौतुकच होत नाही तर हा चित्रपट बक्कळ कमाई देखील करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सुरुवात संथगतीने झाली असली तरी यामी गौतम स्टारर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी उडी घेतली आहे. दुसरीकडे, विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आणि अर्जुन रामपालचा (Arjun Rampal) ॲक्शन चित्रपट 'क्रॅक'च्या (Crakk Movie) कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. या दोन्ही चित्रपटांनी दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत...

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'अर्टिकल 370'ने शनिवारी 7.5 कोटींची कमाई केली आहे. यामी गौतमच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 5.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. शनिवारी 'अर्टिकल 370' ने पहिल्या दिवसापेक्षा 27 टक्के अधिक कमाई केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 13 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. हा चित्रपट रविवारी देखील चांगील कमाई करण्याचा अंदाज आहे. कारण शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी हाच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांच्या स्पोर्ट्स ॲक्शन फिल्म 'क्रॅक'ने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. Sacknilk च्या अहवालानुसार, 'क्रॅक'ने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 2.75 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे क्रॅक चित्रपटाचे एकूण कलेक्शन 7 कोटींवर पोहोचले आहे.

दरम्यान, 'अर्टिकल 370' या चित्रपटाची निर्मिती आदित्य धरने केली आहे. मोनल ठाकूरसह आदित्य धर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे चित्रपटाच्या कथेतून देशभक्तीच्या उदात्त भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाची कथा मुख्यतः जुनी हुस्कर आणि पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथन या दोन पात्रांभोवती फिरते. जुनी हुस्करच्या भूमिकेत यामी गौतम आणि पीएमओ सेक्रेटरी राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत प्रियमणी यांनी चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. अरुण गोविल, यामी गौतम, प्रियामणी, किरण करमरकर, वैभव तत्ववादी यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT