Bollywood Celebrities Support Team India Saam Tv
मनोरंजन बातम्या

World Cup 2023: 'हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है...', वर्ल्डकपमधील पराभवानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींचा टीम इंडियाला सपोर्ट

Bollywood Celebrities Support Team India: या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली.

Priya More

Bollywood Celebrities:

वर्ल्डकप २०२३ मध्ये (World Cup 2023) टीम इंडिया विरूद्ध टीम ऑस्ट्रेलियामध्ये (Team India Vs Team Australia) रविवारी अंतिम सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्वच क्रिकेटप्रेमींना धक्का बसला.

या सामन्यामध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू देखील नाराज झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील वर्ल्डकप जिंकता न आल्याचे दु:ख दिसत होते. या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. अशामध्ये आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाला सपोर्ट केला आहे. त्यांच्या या पोस्ट व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, 'टीम इंडिया या स्पर्धेत ज्याप्रकारे खेळली तो अतिशय आदराचा विषय आहे आणि त्यांनी खूप उत्साह आणि दृढनिश्चय दाखवला. हा एक खेळ आहे आणि त्यामध्ये नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने ते आज घडलं… परंतु क्रिकेटमधील आमच्या खेळाच्या वारशाचा आम्हाला अभिमान वाटल्याबद्दल टीम इंडियाचे आभार… तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. खूप प्रेम आणि आदर. तुम्ही एक अभिमानास्पद राष्ट्र बनवता.'

अभिनेत्री काजोलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर टीम इंडियाचा फोटो शेअर करत लिहिले की, 'हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है... टीम इंडिया खूप चांगली खेळली. ऑस्ट्रेलियाचे आणखी एका विश्वचषकासाठी अभिनंदन.'

सुनील शेट्टीने (Suniel Shetty) आपल्या अधिकृत इन्स्टा स्टोरीवर टीम इंडियाचा (Team India) फोटो शेअर केला. त्याने लिहिले की, 'टीम इंडियासाठीचा वाईट दिवस...पण आपल्या #TeamIndia साठी वाईट वाटायला नको.. कारण त्यांनी सलग 10 सामने खेळले आहेत. चांगली बॉलिंग आणि बॅटिंग करणारी टीम इंडियाची खेळी उत्तमच आहे. मी त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतो.'

Suneil Shetty Insta Story

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्वीट केले आहे. त्यांनी असे लिहिले की, 'साहसी प्रयत्नानंतर एक असा पराभव...निळ्या कपड्यातील सर्वच पुरुषांनी कौतुकास्पद कामगिरी केली. तुमचा अमिभान वाटतोय.'

रितेश देशमुखने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाचा फोटो शेअर त्यांना सपोर्ट केला आहे. त्याने या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही तुमचा आदर करतो. कायमच आम्ही तुमच्या सोबत आहोत.'

Ajay Devgan And Kareena Kapoor Insta post

अभिनेता अजय देवगनने इन्स्टास्टोरीवर टीम इंडियाचा फोटो शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, 'टीम इंडिया शेवटपर्यंत उत्तम खेळली. आम्हाला कायमच त्यांचा अभिमान आहे.'

करीना कपूरने देखील इन्स्टास्टोरीवर टीम इंडियाचा फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. तिने असे लिहिले की, 'फक्त प्रेम आणि आदर.. टीम इंडिया खूप चांगली खेळली.'

अभिनेता बोमन इराणी यांनी ट्वीट करत टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी लिहिले की, 'टीम इंडिया नेहमीच चांगलं खेळत आली आहे. आताही ती चांगली खेळली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT