12th Fail Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

12th Fail Movie: IMDB वर '12th फेल' ठरली बेस्ट फिल्म, 'डंकी' आणि 'OMG 2'ला टक्कर देत टाकलं मागं

Priya More

IMDB Rating Film:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विक्रांत मैसीच्या (Vikrant Massey) '12वी फेल' (12th Fail Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 2023 मध्ये हिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये '12वी फेल' चित्रपटाचा समावेश झाला आहे. आता विधू विनोद चोप्राच्या '12वी फेल'ने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट ठरला आहे. विक्रांत मैसी स्टारर बायोग्राफिकल ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

'12वी फेल' चित्रपटाला आतापर्यंत IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळाला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटने रेटिंगच्या बाबतीत बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या 'डिंकी', 'जवान', 'पठान','OMG-2' आणि रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटालाही मागे टाकले आहे. IMDb वरील टॉप 250 भारतीय चित्रपटांच्या यादीत 12वी फेल पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला 10 पैकी 9.2 रेटिंग देण्यात आले आहे.

12वी फेल व्यतिरिक्त उर्वरित चार चित्रपटांमध्ये 1993 चा अॅनिमेटेड चित्रपट 'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स राम', मणिरत्नमचा 'नायकन', हृषिकेश मुखर्जीचा 'गोल-माल' आणि आर माधवनचा दिग्दर्शनातील तयार करण्यात आलेला पहिला चित्रपट 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' यांचा समावेश आहे. '12वी फेल'नंतर शाहरुख खानच्या 'डिंकी' आणि अक्षय कुमारच्या 'OMG 2'ला 7.6 रेटिंग मिळाले आहेत. तर सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' या चित्रपटाला 7.1 रेटिंग देण्यात आले आहे.

शाहरुखचा दुसरा चित्रपट 'जवान'ला 7 रेटिंग मिळाले आहेत. तर, रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल', 'टायगर-3' आणि 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटांना 6.8 रेटिंग मिळाले आहे. रणवीर सिंग स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला 6.7 तर 'तू झूटी में मक्कर'ला 6 रेटिंग देण्यात आले आहे. 'द आर्चीज'ला 5.9 तर सनी देओलच्या 'गदर 2'ला 5.2 रेटिंग मिळाले आहे.

महत्वाचे म्हणजे, 9.2 च्या रेटिंगसह, 12वी फेल फक्त बॉलीवूडच नाही तर 2023 च्या काही हॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षाही पुढे आहे. या चित्रपटांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स'ला 8.6 रेटिंग, क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'ला 8.4 रेटिंग, 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम-3'ला 7.9 रेटिंग देण्यात आली आहे. मार्टिन स्कॉर्सेसच्या 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला 7.8 रेटिंग, 'जॉन विक: चॅप्टर-4' ला 7.7 रेटिंग आणि 'ग्रेटा गेरविगच्या बार्बी'ला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT