CRAKK Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

CRAKK Teaser: विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या 'क्रॅक'चा टीझर आऊट, अर्जुन रामपालच्या लूकने वेधलं लक्ष

CRAKK Teaser Released: या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला. या टीझरच्या माध्यमातून विद्युतची जबरदस्त अ‍ॅक्शन पुन्हा प्रेक्षकांना पाहायाला मिळाली. जी पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

Priya More

CRAKK Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) स्टारर 'क्रॅक-जीतेगा तो जीएगा' (Crakk Jitega To jiyega Movie) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कमांडो', 'खुदा हाफीज' आणि 'फोर्स' यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अ‍ॅक्शन आणि स्टंटने प्रेक्षकांचे मन जिंकणारा विद्युत आता या चित्रपटात देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.

विद्युत जामवाल या चित्रपटामध्ये अर्जुन रामपालसोबत फायटिंग करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विद्युतच्या धमाकेदार अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला. या टीझरच्या माध्यमातून विद्युतची जबरदस्त अ‍ॅक्शन पुन्हा प्रेक्षकांना पाहायाला मिळाली. जी पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

आदित्य दत्त दिग्दर्शित 'क्रॅक' हा चित्रपट पुढच्या वर्षी २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. विद्युतच्या अ‍ॅक्शने भरलेल्या या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाची एक झलक आज समोर आली. विद्युतने सोशल मीडियावर क्रॅकचा एक जबरदस्त टीझर रिलीज केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

क्रॅकचा टीझर अ‍ॅक्शनने सुरू होतो. विमानातून खाली उडी मारण्याचा सीन असो किंवा शत्रूंशी खतरनाक फायटिंग असो हे या टीझरमध्ये अप्रतिम रित्या दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील संवादही दमदार आहेत. क्रॅकच्या टीझरमध्ये विद्युत जामवाल म्हणतो की,'आयुष्य तर सगळ्यांसोबत खेळते, पण खरा खेळाडू तोच असतो जो आयुष्याशी खेळतो. मी घाबरत नाही, मी धाडसाने खेळतो आणि मी डोक्याने थोडा क्रॅक आहे.'

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अर्जुन रामपालची धमाकेदार एन्ट्री देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटमध्ये अर्जुन रामपाल हा विद्युत जामवालच्या शत्रूच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. त्याचा खतरनाक लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला. या टीझरमध्ये तो हा डॉयलॉग बोलतो की, या गेमचा फक्त एकच नियम आहे. जो जिंकणार तोच जगणार.' या टीझरमध्ये नोरा फतेही देखील दिसत आहे. या चित्रपटामध्ये एमी जॅक्सन देखील मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT