The Great Indian Family Trailer Released Saam tv
मनोरंजन बातम्या

The Great Indian Family Trailer Released: विक्की कौशल-मानुषी छिल्लरच्या 'द ग्रेट इंडियन फैमिली'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहून पोट धरून हसाल...

Vicky Kaushal And Manushi Chhillar: चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट किती जबरदस्त असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

Priya More

The Great Indian Family Movie:

बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार विकी कौशल (Vicky Kaushal) 'जरा हटके जरा बचके' नंतर पुन्हा एकदा चाहत्यांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. विकीचा आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन फैमिली'चा (The Great Indian Family Movie) धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विकी कौशलसोबत या चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक पोट धरून हसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट किती जबरदस्त असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

या फॅमिली कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. तर त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्मच्या बॅनरखाली या चित्रपटाचे निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा ही स्टारकास्ट एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट बॉलिवूडचा कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात विकीने स्थानिक गायक भजन कुमारची भूमिका साकारली आहे. ट्रेलरची सुरुवात विकी कौशलने होते जो स्वतःची ओळख करून देतो आणि म्हणतो की, तो बलरामपूरचा राजा आहे. चित्रपटाची कथा याच ठिकाणच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. भजन कुमारला गाण्याची प्रचंड आवड आहे आणि तो छोट्या-छोट्या कार्यक्रमांतून हा छंद जपताना दिसतो. पण त्याच्या विचित्र कुटुंबामुळे तो खूप नाराज असतो.

भजन कुमारचे कुटुंबीय पूजापाठ वगैरेचे करतात. ते भजनांचे आयोजन देखील करतात ज्यामध्ये बहुतेक भजन कुमार म्हणजेच विकी कौशल गाणं गातो. तो एक मस्त माणूस आहे. जो आपले आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे जगतो. या कॉमेडीने भरलेल्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, पंडित असलेल्या विकीची त्याची प्रेमिका मानुषीला भेटतो तेव्हा त्याच्या इच्छा आणखी बदलतात. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT