Ganraj Gajanan Song: यंदाच्या गणेशोत्सवात राहुल देशपांडेंच्या गाण्याची मेजवानी, ‘गणराज गजानन’ मध्ये अमृता खानविलकरची नृत्य अदाकारी

Ganraj Gajanan Song Released: गायक राहुल देशपांडे आणि नृत्य अदाकारीने घायाळ करणाऱ्या अमृता खानविलकरचं ‘गणराज गजानन’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Ganraj Gajanan Song Released On Social Media
Ganraj Gajanan Song Released On Social MediaSaam Tv

Ganraj Gajanan Song Released On Social Media

सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे. जनसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत व्यग्र आहेत. सध्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक गणपती बाप्पाच्या नव्या गाण्यांची जोरदार चर्चा होत आहे. गणेशोत्सवाला आता जेमतेम एक आठवडा बाकी असून सोशल मीडियावर गाण्यांची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं ‘गणराज गजानन’ हे नवं गाणं सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांच्या गाण्यावर आपल्या नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या अमृता खानविलकरने ठेका धरला आहे.

Ganraj Gajanan Song Released On Social Media
Thalaivar 171: 'जेलर'च्या यशानंतर रजनीकांत यांचा नवा चित्रपट, 'थलाईवर १७१'ची घोषणा

आपल्या दमदार अभिनयाने, नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकरने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अमृता खानविलकरने निर्मित केलेल्या या पहिल्या गाण्याचं नाव ‘गणराज गजानन’ आहे, हे गाण्याला राहुल देशपांडे यांचा सुमधुर आवाज आणि संगीत लाभले आहे तर या गाण्याला समीर सावंत यांनी शब्दबद्ध केले आहे. आशिष पाटीलने गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले असून संजय मेमाणे यांनी गाण्याची शूटिंग केली.

काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी ‘गणराज गजानन’ या गाण्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. यांनी घोषणा केल्यानंतर, चाहत्यांमध्ये गाण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर हे मन प्रफुल्लित करणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आता अधिकच भक्तिमय होणार हे नक्की. (Song)

नवीन गाण्याविषयी अमृता खानविलकर सांगते, “बाप्पाच्या गाण्याच्या निमित्ताने मी माझे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. बाप्पाची मूर्ती ज्याप्रमाणे हळूहळू आकार घेते, तशीच अतिशय श्रद्धेने ही कलाकृती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. मन तल्लीन करणारे हे गाणे असून ‘गणराज गजानन’सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने अतिशय मन लावून या गाण्याची अर्थात ‘गणरायाची’ सेवा केली आहे. माझ्या पहिल्याच प्रयत्नाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल मी सगळ्यांचीच खूप कृतज्ञ आहे.” (Entertainment News)

Ganraj Gajanan Song Released On Social Media
Vanita Kharat Struggle Story: हास्यजत्रा फेम वनिता खरातला इंडस्ट्रित येण्याआधी वाटायची भीती; केला मोठा खुलासा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com