elnaaz norouzi saam tv
मनोरंजन बातम्या

स्वतःचे कपडे उतरवले, बॉलिवूड अभिनेत्रीनं VIDEO शेअर करत इराणी महिलांना दिला पाठिंबा

एलनाजने हिजाबाच्या वादात अडकलेल्या महिलांना व्हिडिओतून पाठिंबा दर्शवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: सध्या महिलांच्या हिजाबावरुन अनेक वाद सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच इराणमध्ये हिजाबवरुन महिलांमध्ये रणकंदन पेटले होते. तरुणींनी हिजाब न घातल्याने तिथल्या पोलिस (Police) प्रशासनाने महिलांवर कारवाई करण्यासाठी सुरुवात केली होती. तर दुसरीकडे भारतात याविरोधात आवाज उठवला जात आहे. नुकतेच नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक गाजलेली, हिट वेबसीरिज असलेली 'सेक्रेड गेम्स' फेम एलनाज नोरोजीने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एलनाजने हिजाबाच्या वादात अडकलेल्या महिलांना व्हिडिओतून (Video) पाठिंबा दर्शवला आहे. (Bollywood News In Marathi )

एलनाजने मंगळवारी इराणमधील महिलांच्या पाठिंब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत हिजाबाला विरोध दर्शवला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत एलनाज म्हणते, 'जगातील प्रत्येक महिलेला तिच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. कोणीही महिलेविषयी आपले मत मांडू नका किंवा तिला काहीही विचारण्याचा अधिकार नाही.

प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. त्यांचा आदर केला पाहिजे. लोकशाहीचा अर्थ निर्णय घेण्याची ताकद असा आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र्य हवे. मी स्वत:चे कपडे काढत 'फ्रिडम ऑफ चॉईस'ला प्रोत्साहन देत नाही.'

पोलिसांच्या अप्रामाणिकपणाला घाबरून इराणी महिलांनी स्वतः हे कृत्य करण्यासाठी भाग पाडल्याचे दिसत आहे. इस्लामिक राष्ट्राच्या पोशाखाचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला व्हाईस युनिटच्या हिरव्या आणि पांढऱ्या व्हॅनमध्ये हेडस्कार्फ कसे घालायचे या व्याख्यानासाठी नेण्यात आले होते.

अनेक इराणी महिलांना याहून अधिक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्या पैकी २२ वर्षीय महसा अमिनी. 16 सप्टेंबर रोजी तेहरानमधील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आणि तीन दिवसांनी मृत घोषित केले. भारतात काम करण्यापूर्वी, एलनाज नोरोजीने Dior, Lacoste आणि Le Coq Sportive सारख्या ब्रँडसाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून १० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT