Zindagi Tere Naam Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Yodha'मधील 'जिंदगी तेरे नाम' गाण्याचा टीझर आऊट, Rashi Khanna आणि Sidharth Malhotra ची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली

Zindagi Tere Naam Song: या चित्रपटातील 'जिंदगी तेरे नाम' (zindagi tere naam song) हे गाणं २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर आऊट करण्यात आला. या गाण्याचा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

Priya More

Sidharth Malhotra And Disha Patani :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या त्यांच्या अपकमिंग 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर १९ फेब्रुवारीला या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. या चित्रपटातील 'जिंदगी तेरे नाम' (zindagi tere naam song) हे गाणं २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर आऊट करण्यात आला. या गाण्याचा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​अभिनीत 'योद्धा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना चित्रपटासोबतच या गाण्याची उत्सुकता लागली आहे. 'जिंदगी तेरे नाम' या गाण्याच्या टीझरमध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यातील खास केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे. राशी आणि सिद्धार्थ यांची ऑनस्क्रीन झलक पडद्यावर बघायला मिळणार आहे. या गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांना या गाण्याची छोटी झलक दाखवली आहे. २४ फेब्रुवारीला म्हणजे उद्या या चित्रपटातील हे गाणं रिलीज होणार आहे.

'योद्धा' चित्रपटातील 'जिंदगी तेरे नाम' हे गाणं कौशल किशोर यांनी लिहिले आहे. तर विशाल मिश्राने हे गाणं गायलं आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी हे गाणं दिग्दर्शित केले आहे. योद्धा चित्रपट येत्या १५ मार्च २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. राशी खन्नाचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाद्वारे या दोघांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. त्याची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

करण जोहरच्या 'योद्धा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, योधा फिल्म धर्मा प्रोडक्शनची पहिली एरियल ॲक्शन फ्रँचायझी आहे. राशी खन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, राशी लवकरच 'योद्धा' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राशी 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'टीएमई' मध्ये विक्रांत मैसीसोबत दिसणार आहे. यासोबतच शाहिद कपूरच्या 'फर्जी 2' चित्रपटामध्ये ती पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT