Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade Health Update: मी आता थोडा बरा आहे..., श्रेयस तळपदेने स्वत:च दिले हेल्थ अपडेट

Shreyas Talpade: श्रेयसच्या तब्येतीबाबत दररोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये आता अभिनेत्याने स्वत:च त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स (Shreyas Talpade Health Update) दिले आहेत.

Priya More

Shreyas Talpade News:

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) ५ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तात्काळ अंधेरी पश्चिमच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. आता श्रेयसची तब्येत हळूहळू सुधारत आहे. श्रेयसच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल खूपच काळजी वाटत आहे.

अशामध्ये तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याला डिस्चार्ज मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत. श्रेयसच्या तब्येतीबाबत दररोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये आता अभिनेत्याने स्वत:च त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स (Shreyas Talpade Health Update) दिले आहेत.

श्रेयस तळपदेने नुकताच 'झूम'शी संवाद साधला आणि त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांसोबत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. श्रेयसने सांगितले की, 'तुमच्या पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. मी आता थोडा बरा आहे.' यावेळी अभिनेत्याला डिस्चार्जबाबत देखील विचारण्यात आले. तेव्हा त्याने सांगितले की, 'डिस्चार्ज मिळाले नाही. अजूनही रुग्णालयातच आहे.'

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयस तळपदेवर अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला रविवारी किंवा सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता सोहम शाहने दिली होती. पण अद्याप श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

14 डिसेंबर 2023 रोजी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तो 'वेलकम टू जंगल'च्या शूटिंगवरून घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याला आपली तब्येत बरी नसल्याचे वाटले. त्याने तात्काळ पत्नी दिप्तीला याची माहिती दिली. त्याच्या पत्नीने तात्काळ त्याला रुग्णालयात हलवले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वी श्रेयस बेशुद्ध पडला. रुग्णालयात जाताना त्यांना ट्राफिकचा देखील सामना करावा लागला होता. असे सांगितले जात होते की, ज्यावेळी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्याचे हृदय १० मिनिटांपर्यंत बंद पडले होते. त्याचा को-स्टार बॉबीने ही माहिती सांगितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT