Viral Video: हास्यजत्रेतील 'अवली लवली कोहली...' नंतर 'आम्ही बाई सुना...' गाणं व्हायरल, तुम्ही पाहिलं का?

Maharashtrachi Hasya Jatra Viral Video: शिवाली, नम्रता आणि चेताना या तिघींनी सुनबाईची भूमिका साकारलीये. सासू म्हणजे प्रत्येक सूनेच्या डोक्याला मोठा ताप असतो. असं त्यांनी आपल्या स्कीटमधून मांडलं आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Aamhi Bai Suna Video:

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येक मराठी माणूस पाहतो आणि खळखळून हासतो. दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी आणि मनसोक्त हसण्यासाठी सर्वजण हा कार्यक्रम पाहतात. यातील अनेक स्किटचे शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Hingoli Crime News : हिंगोलीत विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; महिलेच्या 'त्या' गुपिताचा आरोपींनी घेतला गैरफायदा

सासू आणि सुनबाई यांची कॉमेडी असलेल्या बऱ्याच स्कीट आजवर तुम्ही पाहिल्या असतील. याच स्कीटमधला एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये वनिता खरात सासूच्या भूमिकेत आहे. तर शिवाली, नम्रता आणि चेताना या तिघींनी सुनबाईची भूमिका साकारलीये. सासू म्हणजे प्रत्येक सुनेच्या डोक्याला मोठा ताप असतो. असं त्यांनी आपल्या स्कीटमधून मांडलं आहे.

ही स्कीट करताना त्यांनी सासूच्या त्रासावर एक गाणं गायलंय. अवली लवली हे गाणं जसं व्हायरल झालं होतं तसंच आता सासूच्या स्कीटमधलं गाणं व्हायरल होतंय. "आम्ही बाई सुना,आम्ही बाई सुना, सासूबाई लावी आमच्या संसाराला चुना" अशा मजेशीर ओळी असलेल्या या गाण्यावर नम्रता, चेतना आणि शिवाली डान्स करत असतात.

या गाण्यावर त्यांनी केलेल्या डान्स स्टेप्स देखील फार मजेशीर आहेत. @Sonymarathi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनीच हा ऍपिसोड पाहण्याची इच्छा व्यक्त केलीये. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हुव्ज मिळालेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सध्या पाचवं पर्व सुरू आहे. साल २०१८ मध्ये या कार्यक्रमाला सुरूवात झाली होती. गेली ५ वर्षे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. रोजच्या जीवनातील आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्यातील अडचणीचे विषय या कार्यक्रमातून मांडले जातात. यात कधी सामाजीक संदेश देखील दिला जातो. काही स्कीट इतक्या भन्नाट असतात की, हसूण हसूण काही व्यक्तींच्या डोळ्यांतून अश्रू येतात.

Viral Video
Andheri Crime News: कस्टम अधिकारी असल्याचं सांगत ९ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com