Shraddha Kapoor With Mystery Man Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये श्रद्धा कपूरसोबत असलेला मिस्ट्री मॅन कोण?, VIDEO होतोय व्हायरल

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding: श्रद्धा कपूर एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. मिस्ट्री मॅनसोबतचे श्रद्धाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही व्यक्ती आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी श्रद्धाचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

Priya More

Shraddha Kapoor And Rahul Mody:

बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा कपूर आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे देखील नेहमी चर्चेत असते. नुकताच ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) सहभागी झाली. यावेळी श्रद्धा कपूर एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. मिस्ट्री मॅनसोबतचे श्रद्धाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही व्यक्ती आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी श्रद्धाचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या रिलेशनची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. श्रद्धा आणि राहुल एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. श्रद्धा कपूर नुकताच जामनगर येथे सुरू असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाली. यावेळी श्रद्धा कपूरसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी देखील दिसला. दोघांनी देखील एकत्र एन्ट्री केल्यामुळे सर्वजण चकीत झाले. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांना पापाराझींनी एकत्र कॅमेऱ्यामध्ये कैद केले. त्यानंतर या कपलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या कपलने अद्याप आपल्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली नाही. राहुल मोदी 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचा लेखक आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर मु्ख्य भूमिकेमध्ये होती. या व्यतिरिक्त राहुल मोदीने 'प्यार का पंचनामा २' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' यासारख्या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील लिहिली आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूर 'स्त्री २' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक मुखर्जी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. श्रद्धा कपूरला 'आशिकी' चित्रपटातून खूप चांगली पसंती मिळाली. श्रद्धा कपूर उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट गायिका देखील आहे. ती तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT